मुख्य सामग्रीवर वगळा

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले : माहिती | निबंध | भाषण | [ Marathi ]

 आपल्या मराठी शिक्षण पद्धतीत मोलाचे बदल घडवून आणणारे आणि मुलींना शिक्षणाचा अधिकार मिळवून देणाऱ्या सावित्रीबाई फुले  यांच्या बद्दल आपण आजच्या ह्या पोस्ट मध्ये सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल माहिती  जाणून घेणार आहोत 

सावित्रीबाईंचे बालपण : Savitribai's childhood

वास्तविक रत्ने प्रथम भारतीय महिला शिक्षिका- सावित्रीबाई फुले यांचे वास्तविक रत्न त्यांच्यावर विश्वास ठेवायला नेहमीच कमी आहे. समाजसेविका कवी आणि वंचितांना विरुद्ध आवाज उचलणारे सावित्रीबाई फुले यांचा जन्म नायगाव सातारा जिल्ह्यात 3 जानेवारी 1831 मध्ये झाला. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई आणि वडील खंडोजी नेवसे होते. सावित्रीबाईंचा लग्न अवघ्या नवव्या वर्षी ज्योतिराव फुले यांच्याशी झाले, ज्योतिरावांचे वय तेरा वर्षे होते जेव्हा त्यांचे सावित्री बाईशी लग्न झाले

सावित्रीबाई फुले यांची संपूर्ण माहिती || Savitribai Phule information In Marathi

सावित्री शिकली मग समाज शिकला

         ज्योतिराव फुले हे सुशिक्षित तरुण होते त्यांचे सावित्रीबाईंची लग्न झाल्यानंतर त्यांनी आपल्या पत्नीलाही शिकवण्याचा करण्याचा निर्धार केला. 1841 साली महात्मा ज्योतिराव फुले यांनी घरापासूनच म्हणजेच सावित्रीबाईंच्या शिक्षणाचा आरंभ केला होता आणि  सोबत सगुणाई म्हणजे त्यांची मावस बहीण ही होती शिकायला.  जुन्या चालीरीती मुळे ज्योतीबांच्या घरच्यांनी दोघांनाही घराबाहेर काढले पण तरीही जोतिबांनी सावित्रीबाईंना शिकवण्याचे कार्य चालूच ठेवले. 

हे पण जाणून द्या : राजमाता जिजाबाईं विषयी थोडक्यात महत्वपुर्ण माहिती

त्यांना शिकवण्यासाठी त्यांचा प्रवेश प्रशिक्षण शाळेत करविला. समाजाने इतका विरोध केल्यानंतरही सावित्रीबाई चिकाटीने शिकल्या आणि आपले पूर्ण शिक्षण केले. पुढे या शिक्षणाचा उपयोग त्यांनी मुलींना शिकवण्यासाठी केला. 1848 मध्ये त्यांनी पुणे येथे भिडे वाड्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. 12 फेब्रुवारी 1853 साली विश्रामबागवाडा येथे तीन हजार लोकांसमोर मुलींच्या पहिल्या शाळेची परीक्षा घेण्यात आली

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले : माहिती | निबंध | भाषण | [ Marathi ]

 सावित्रीबाईंचे समाज कार्य

         ज्या काळात स्त्रीने घराबाहेर पडणे म्हणजे पाप समजले जाते. अशा काळात ज्योतिबा फुले यानी मुलीना शिकवण्याचा  वेढा उचलला. त्यांच्या कार्याला सावित्रीबाईंनी खांद्याला खांदा लावून साथ दिली, सावित्रीबाईंनी प्रथम स्वतः शिक्षण घेतले त्यानंतर मुलींना शिकवू लागल्या. परंपरागत समजुतीने ग्रासलेल्या समाजाकडून अनेक अपमान त्यांना सहन करावे लागले लोक त्यांच्या अंगावर दगड व शेण फेकून मारत असत. त्या अधिक संघर्ष करत गेल्या पण त्यांच्या समर्थनास त्यांच्याबरोबर कोणीही नव्हते त्यांच्या पतीशिवाय.  ज्योतिराव फुले यांनी सावित्रीबाई चे समर्थन केले कारण त्यांना माहीत होतं की त्या काही चुकीचं काम नव्हत्या .महात्मा फुले शिक्षित असल्यामुळे त्यांना सगळं कळत होतं.

 सावित्रीबाईंवर लोक दगड -शेण मारत असताना त्या सगळं मुकाट्याने सहन करत होत्या फक्त यासाठी की पुढं भविष्यात स्त्रीने ही शिकून पुढं जावं .एकदा तर सावित्रीबाई तापाने फणफणल्या होत्या त्यामागे कारण असे होते की लोकांनी फेकून मारलेल्या शेणामुळे त्यांची साडी ओली होत असे आणि कित्येक दिवस असच जात असल्यामुळे त्या अचानक तापाने ग्रस्त झाल्या ज्योतिरावांनी त्यांना कारण विचारलं तर त्यांनी त्यांच्याजवळ कसलीच तक्रार नाही केली. त्यांना फक्त त्यांना दोन साडी आणून देण्याची विनंती केली आणि काही दिवसांनी त्या अचानक नीट झाल्या 

सावित्रीबाई लोकांच्या अन्यायाला घाबरून मागे सारल्या नाहीत आणि प्रवाहामधून पुढे जात प्रथम भारतीय महिला शिक्षक म्हणून इतिहास घडवला सावित्रीबाई एक समाजसुधारक तसेच कवयित्री झाल्या. हुंडा आणि बालविवाहाच्या विरोधात लढल्या, महिला समाजवादी म्हणून महिला सेवा मंडळ सुरू केले त्याने विधवेचे मुंडण करणाऱ्या नायकान विरुद्ध प्रहार केला, पती मेल्यानंतर सती जाण्याच्या प्रथेला सक्त विरोध केला

 गर्भवती बलात्कार पीडितांसाठी बाल हत्या प्रतिबंधक गृह उभे केले त्यांनी सर्व महिलांचा ताबा घेऊन महिलांच्या शिक्षणासाठी अविभाज्य स्थिती पसरवण्यासाठी स्वतः च संपूर्ण आयुष्य खर्च केला.  सावित्रीबाईंनी महिलांकरिता अधिकारासाठी बोलणारी पहिली भारतीय महिला होती!!

सावित्रीबाईंचे वैयक्तिक जीवन : Savitribai's personal life

      सावित्रीबाईंचे लग्न ज्योतिराव फुले यांच्याशी 1840 मध्ये झाले त्यांना स्वतःच्या पोटचे एकही मूल नव्हते पण त्यांनी काढलेली विधवा गर्भवती बाल प्रतिबंधक गृह संस्थेत जन्मलेल्या एका मुलाला दत्तक घेतले व त्याचे नाव यशवंत फुले असे ठेवले सावित्रीबाईंनी यशवंत ला पोटच्या मुलासारखे वाढवले व त्याला डॉक्टर बनवले यशवंत विधवा स्त्रीच्या पोटी जन्माला आलेल्या मुळे विवाहाच्या वेळी त्याला कोणीही मुलगी देत नव्हते म्हणून कार्यकर्ता धनाजी ससाने यांनी आपली राधा नावाच्या मुलीचे विवाह यशवंत सोबत लावून दिला आणि हाच विवाह आंतरजातीय विवाह म्हणून ओळखला जातो

हे पण जाणून द्या : राजमाता जिजाबाईं विषयी थोडक्यात महत्वपुर्ण माहिती

सावित्रीबाईंच्या सन्मानार्थ केलेल्या गोष्टी : Things done in honor of Savitribai

          समाजाच्या अनेक कळा (दुःख ) सोसूनही सावित्रीबाईंनी मुलींना शिक्षण देण्याचे कार्य चालूच ठेवले, पुढे 28 नोव्हेंबर 1890 रोजी ज्योतिरावांचे निधन झाले, तरीही सावित्रीबाईनी खचून न जाता मुलींना शिकवण्याचे कार्य अग्रभागी ठेवले स्त्रियांनी शिकलेच पाहिजे असं त्यांचं ब्रीदवाक्य होतं 

आज आमच्या हातात पाटी आहे कारण सावित्रीबाई शिकल्या आणि मुलींना शिकवण्याचे कार्य हाती घेतले.  ब्रिटिश सरकारने सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांचे हे कार्य पाहून त्यांचा यथोचित गौरव केला सावित्रीबाईंच्या महान कार्याच्या सन्मानार्थ 9 ऑगस्ट 2014 रोजी पुणे युनिव्हर्सिटी चे नाव सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी असे ठेवण्यात आली. आधुनिक जगात सावित्रीबाईंच्या नावाने अनेक पुरस्कार समाजसेवी महिलांना हुशार विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले हा पुरस्कार देण्यात येतो

सावित्रीबाई फुले एक कवि : Savitribai Phule as a poet:

      बहुजनांना शिक्षण देणारे सावित्रीबाई फुले कवयित्री म्हणून सुद्धा ओळखले जातात त्यांनी काव्यफुले व बावनकाशी , सुबोध रत्नाकर ही दोन पुस्तके त्यांनी लिहिली पण ही पुस्तके त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाली काव्यफुले हे पुस्तक 1934 मध्ये तर बावन काशी सुबोध रत्नाकर हे 1982 मध्ये प्रकाशित झाली

सावित्रीबाईंचा मृत्यू : Death of Savitribai

        जोतीरावांच्या मृत्यूनंतरही सावित्रीबाई कार्यमग्न राहिल्या ,अचानक 1897 ला पुण्यात महाभयंकर अशी प्लेगची साथ पसरली होती. प्लेगेने सगळीकडेच थैमान घातले होते या रोगाने हजारो लोकांचे जीव घेतले आणि अशा परिस्थितीत सावित्रीबाईंनी उद्भवणारे हालात लक्षात घेऊन स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अनेक लोकांना या रोगातून मुक्त केले पण शेवटी प्लेग पीडितांची मदत करता करता त्यांनाही या रोगाने ग्रासले व शेवटी 10 मार्च 1897 रोजी वयाच्या 66 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला

        सावित्रीबाई फुले ह्या फक्त शिक्षका नव्हे तर पहिल्या महिला मुख्याध्यापिका पण आहेत अनंत अडचणींवर मात करून त्यांनी स्त्रियांना शिकवण्याचे कार्य केले हे कार्य इतिहासाच्या पानावर सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले व स्त्री शिक्षणाचा पाया रोवला गेला.

 तो फक्त सावित्रीबाई फुले मुळेच आधुनिक जगात स्त्री प्रत्येक क्षेत्रात नाव कमवत आहे आणि आपल्या पायांवर खंबीरपणे उभी आहे, ते फक्त सावित्रीबाई मुळे प्रत्येक मुलीच्या हातावर पाटी आहे याचं संपूर्ण श्रेय सावित्रीबाईंना जाते. सावित्रीच्या लेकींना शिक्षण हे सगळ्यांना पेक्षा श्रेष्ठ आहे त्यांच्या महान कार्याला वाया जाऊ देऊ नका. दगड, गोटे, शिव्या, शेण खाऊन त्यांनी मुलींना शिकवण्याचे पराकोटीचे धैर्य केले अशा या महान स्त्रीला माझा त्रिवार वंदन!!

निष्कर्ष

पहिले भारतीय महिला  शिक्षक असल्याचे मान सावित्रीबाई फुले यांना जातो . भारतातील अज्ञानाला दूर करून त्यांना ज्ञात करून प्रकाश दाखवण्याचे महान कार्य सवित्रीबाईंनी केले. जर ही आपणास आवडली असेल तर नक्की या पोस्ट ला आपल्या भाऊ बहिणी आणि परिवारासोबत शेयर करा धन्यवाद ! 

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कब्बड्डी या खेळाची माहिती | Kabaddi Information in Marathi

 आजच्या संगणक आणि मोबाईलच्या युगात मुलांचे मैदानी खेळ खेळण्याचे प्रमाण कमी झाले आहे त्यामुळे मुलांच्या आरोग्यावर याचा खूप परिणाम होत आहे 'सुदृढ आरोग्य हीच आपली खरी संपत्ती आहे 'आणि याचे महत्त्व दिवसेंदिवस अधिक ठळकपणे समोर येत आहे आपण लहानपणापासून "आरोग्य धनसंपदा"  हा श्लोक म्हणत आहोत आणि आपलं आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी व्यायाम मध्ये सातत्य ठेवावे लागते आणि ते ठेवणे आज-काल अवघड झाले आहे म्हणूनच यावर उत्तम उपाय म्हणजे खेळ .या जगात खेळ न आवडणारा माणूस विरळाअसेल.खेळ हे दोन प्रकारचे असतात, बैठे आणि मैदानी पण खेळ कोणताही असो त्याने मन आणि शरीर तंदुरुस्त राहते आपले कौशल्य विकसित होते त्यामुळे आज आपण कबड्डी या लोकप्रिय व राज्यस्तरीय स्तरावर खेळल्या जाणाऱ्या खेळाबद्दल माहिती जाणून घेऊया कबड्डीचा(हुतुतू) उगम- हुतुतू या   महाराष्ट्रीयन  शब्दापासून कबड्डी हा शब्द तयार झाला आहे कबड्डी हा सांघिक मैदानी खेळ आहे अनेक तज्ञ व जाणकारांचा मते महाभारतातील अभिमन्यू या थोर योध्याने या खेळाची सुरुवात केली होती असे मानले जाते तर या खेळाची सुमारे चार हजार वर्षांपासून ख्याती आहे प्रत्येक राज्याच्

संत तुकाराम महाराजांचे चरित्र | Sant Tukaram Information in Marathi

 तुकाराम महाराज हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील एक संत होते आज आपण संत तुकाराम यांच्या बद्दल माहिती जाणून घेणार आहोत चला तर जाणून घेऊयात संत तुकाराम यांची जीवनप्रवास जाणून घेउयात  तुकाराम महाराजांचा जन्म        महाराष्ट्रातील देहू या पावन क्षेत्री एका मोरे घराण्यात इसवी सन १६०८ रोजी वसंत माघ शुद्ध पंचमीला संत तुकाराम महाराजांचा जन्म झाला. तुकाराम महाराजांचे संपूर्ण नाव तुकाराम बोल्होबा आंबिले असे होते. वडिलांचे नाव बोल्होबा आंबिले व आईचे नाव कनकाई आंबिले असे होते. तुकारामांच्या वडीलांची शेतीभाती होती त्यांचे किराणा मालाचे दुकान सुद्धा होते. बोल्होबा म्हणजेच तुकारामांचे वडील अडल्या-नडल्यांना कर्ज देत असत.  बोल्होबा आंबिले यांना तीन अपत्ये होती पहिला सावजी मधले तुकाराम व कान्होबा पण तुकारामांचा मोठा भाऊ स्वभावाने विरक्त होता व कान्होबा सर्वात लहान असल्याने घराची संपूर्ण जबाबदारी तुकोबांवर होती. तुकोबांचे लग्न चौदाव्या-पंधराव्या वर्षी पुण्याचे आप्पाजी गुळवे यांची कन्या आवली (आवडी ) हिच्याशी प्रथम विवाह झाला, त्यानंतर त्यांच्यावर अचानक दुःखाचे डोंगर कोसळू लागले त्यांना अनेक प्राप

महात्मा गांधी- जीवन परिचय मराठी मध्ये ~ Mahatma Gandhi Information In Marathi

 आज आपण स्वातंत्र्य स्वतंत्र भारतात मुक्तपणे श्वास घेत आहोत, कारण की ते हुतात्म्यांनी व स्वातंत्र्यलढा यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी संपूर्ण जीवन समर्पित केले. त्या स्वातंत्र्यलढा पैकी एक आहेत आपले राष्ट्रपिता महात्मा गांधी, भारतमातेचे थोर सुपुत्र जगाला अहिंसेचे महान संदेश देणारे गांधीजी हे वंदनीय युगपुरुष होते. ते आपल्या कर्तृत्वामुळे महात्मा व राष्ट्रपिता अशा पदापर्यंत पोहोचले महात्मा गांधींचा जन्म          महात्मा गांधी या थोर राष्ट्रपिता जन्म 2 ऑक्टोबर १८६९ साली काठीयावाड पोरबंदर गुजरात येथे पुतळीबाई यांच्या पोटी झाला. गांधीजींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते, त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद गांधी व आईचे नाव पुतळीबाई गांधी असे होते, गांधीजी हे करमचंद यांच्या चौथ्या पत्नीचे म्हणजेच पुतळीबाईचे सुपुत्र आहेत आधीच्या तीन पत्नी या गर्भवती असतानाच मरण पावल्या .गांधीजींच्या आजोबाचे नाव उत्तम चंद उर्फ उत्ता गांधी असे होते, करमचंद गांधी हे गुजरातमधील पोरबंदर मध्ये दिवाण होते. धार्मिक वातावरणातील बालपणाचा मोठा प्रभाव गांधीजींच्या मनावर झालेला होता. विशेषता अहिंसा सहिष्णुता शाकाह