मुख्य सामग्रीवर वगळा

शिवाजी महाराजाची खरी कर्मकहाणी | Shivaji Maharaj Information in Marathi

 नमस्कार शिवभक्त मावळ्यांनो आपला देश फार विशाल आहे त्याला दोन अडीच हजार वर्षाचा इतिहास आहे या इतिहासात शेकडो राजे महाराजे होऊन गेले आहेत पण राजा म्हंटल्यावर आपल्या डोळ्यासमोर एकच राज्याची प्रतिमा येते ती म्हणजे फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज..

शिवाजी महाराज हे राजांचे राजे होते त्यांच्या सारखा महान राजा चार शतके होत आली तरीही जन्माला नाही आला आणि या महान राजाला जन्म देणाऱ्या थोर जिजाबाई शहाजी राव भोसले, भोसल्यांच्या घराण्यात शिवरायांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर 19 फेब्रुवारी 1630 रोजी झाला. शिवाजी महाराजांचे नाव भगवान शिव यांच्या नावाने नव्हे तर प्रादेशिक देवता शिवाई म्हणून पडले.

जाणून ध्या  शिवाजी महाराजाची खरी कर्मकहाणी  | Shivaji Maharaj Information in Marathi


                      अंगणातील तुळस, गोठ्यातील गाय, आणि घरातील माय स्वराज्यात सुरक्षित होते कारण जिजाऊंनी शिवाजी महाराजांना अगदी  कणखरपणे प्रशिक्षण देऊन अवघ्या 14-15  वर्षी त्यांचा स्वराज्यभिषेक करून रयतेचा राजा उभा केला शिवाजी महाराजांची उंची 5.6 फीट होती त्यांनी अगदी लहान वयात स्वराज्य रक्षणा चे धोरण हाती घेतलं 
हे खूप धाडस पणाचे काम म्हणावे लागेल आणि हे धाडस फक्त आपल्या महाराजांवळ होतं म्हणूनच म्हणतात ना विजय त्याचाच होतो जो विजयासाठी साहस करतो राज्याभिषेक फक्त जनतेसाठी नव्हता तर देशातील तमाम अन्याय- कारी शाहयांना कल्याणकारी स्वराज्याचे अस्तित्व दिमाखात दाखवले गेले असे हे पराकोटीचे धैर्य आपल्या शिवाजी महाराजांजवळ होते हे मान्य करायला काहीच हरकत नाही

           जगात जर यशाचा मार्ग नसेल तर ते मी शोधीन आणि नसेल तर स्वतः निर्माण करीन असे म्हणणारे शिवराय खरोखरच लहानपणापासून खूप धैर्यवादी होते त्यांनी बालपणी घोडस्वार, सह्याद्री सारख्या घनदाट टेकडी आणि जंगले ते आपल्या मावळ्यांसोबत चढायला जात. माता जिजाबाईंनी त्यांना रामायण महाभारतातील थोर कृष्णांच्या गोष्टी सांगितल्या आणि लहानपणीच त्याच्या मनावर धाडसी वृत्ती बिंबवल्या आणि आज तोच शिवाजी रयतेचा राजा ,  म्हणून ओळखला जातो

            पन्हाळ्याच्या वेढ्यात सगळीकडून अपयश येत असतानाही न डगमगता रणनीती आखली आणि वेढ्यातून सुखरूप बाहेर पडले आणि या रणनीती मुळेच शिवाजी महाराज द मॅनेजमेंट ऑफ गुरू असे ओळखले जाता अपयश ज्यांचा शब्दकोशातच नाही असेही शिवाजी महाराज लाखो लोकांच्या मनावर राज्य करतात शिवाजी महाराज मराठा असले  तरीही त्यांच्या मते मराठे म्हणजे मरेपर्यंत  शत्रूला ठाम  असणे असे होते तोच खरा मराठा होय असं शिवाजी महाराज म्हणत असत

      भवानी मातेचा लेक तो स्वराज्याचा राजा तो 

         झुकला नाही कोणासमोर मुघलांचा बाप तो

         एका यशस्वी नेतृत्वाकडे उच्च कोटीची बुद्धिमत्ता असणे आवश्यक असते आता जगात किती बुद्धिमत्ता असावी असे जर विचाराल तर माफक प्रमाणात सांगायचे तर किमान आपल्या सहकार्या पेक्षा दुप्पट तरी असली पाहिजे आणि एवढे पण बुद्धिमत्ता नसेल तर त्याचे अनुयायी सहकारी त्याचा आदर तो कशासाठी करतील बुद्धिमान नेत्याला कायम सन्मान दिला जातो 

बुद्धिमत्ता हा विषय शिवाजी महाराजांच्या बाबतीत म्हणाल तर जगाला आश्चर्यचकित करणारे त्याच वेळी शत्रूची अक्कल गुंग करणारे महाराज जागतिक पातळीवर बुद्धीवानांच्या शिरोभागी असल्याचे आपणास पाहायला मिळते शिवाजी महाराजांचा पराक्रम आणि धाडस एवढे मोठे आहेत की ते पाहून कधीच कोणा सरसेनापती ला किंवा मंत्राला महाराजांसमोर बढाई मारावी किंवा महाराजांना शहाणपणाचा सल्ला द्यावा अशी कधीच संधी मिळाली नाही कारण महाराज स्वतः मित्रांना जे जमणार नाहीत ती कामे स्वतःच्या हाती घेत वयाच्या अठराव्या वर्षी फत्तेखान आला महाराज स्वतः सामोरे गेले

 इतिहास घडविणारे अनेक असतात 

पण शत्रूच्या छावणीत घुसून बोट कापणारे   

                     फक्त छत्रपती शिवाजी महाराजचं..!!                           

  अफजलखानाला भेटायला कोणी सेनापती व मंत्री न पाठवता स्वतः भेटले शाहिस्तेखानावर छापा टाकायला दुसऱ्यांना पुढे न करता स्वतः लाल महालात घुसले इतरांना न पाठविता स्वतः गेले आणि दक्षिण दिग्विजय ते सुरत मोहीम बुऱ्हाणपूर, कारंजा, कारवार ,राजापूर अशा अनेक मोहिमा स्वतः केल्या आणि जगाला आपल्या बुद्धिमत्तेची चमक दाखवून दिली महाराजांची बुद्धिमत्ता पर्यायाने पराक्रम एवढ्या कुतूहलाचे विषय होऊन बसले  

युरोपियन लोकांना महाराजांची तुलना अलेक्झांडर द ग्रेट ,सिजर, हॉनीबोल, सेटोरियस अशा नावाजलेल्या लोकांशी करावी लागली जगात पहिल्यांदा वाघ नखाचा वापर करण्याचा विक्रम महाराजांच्या नावावर आहे महाराजांना लोक देवा पेक्षाही जास्त मानत होते, आजही मानतात त्यांचा देवा होऊनही श्रेष्ठ कामांमुळे ,समता, न्याय, बंधुता यांचे राज्य म्हणजे स्वराज्य निर्माण केले म्हणून

स्त्रीशक्तीला प्रेरणा देणारे : शिवाजी महाराज

                      शिवाजी महाराज हे स्त्रीशक्तीला प्रेरणा देणारे होते हिरकणी नावाची गवळण गडावर दूध घालण्यासाठी येत असे एकदा ती रायगड बघण्यात दंग झाली आणि सूर्य मावळून महादरवाजा बंद झाला आता सकाळ झाल्याशिवाय रायगडाचा दरवाजा कोणत्याही परिस्थितीत उघडला जाणार नव्हता आणि या गवळणीचे लहान मुल पाळण्यात होते त्या गवळणी ने मुलाच्या प्रेमापोटी एका कड्यावरून गड उतरण्याचा निर्धार केला 

चंद्रप्रकाशात तिने आपला मार्ग निवडला आणि ती गड उतरली सुद्धा तिकडे दुसऱ्या दिवशी पहारेकरी आणि किल्लेदार याची शोधाशोध आणि पळापळ सुरू झाली गडाचा दरवाजा बंद असताना गवळण गेली कुठे नंतर कळले की गवळण रात्रीत कडा उतरून आपल्या घरी गेली आणि सुखरूप आहे एव्हाना ही बातमी गुप्तहेरांनी महाराजांना सांगितली महाराजांनी त्या गवळणीला बोलावून घेतलं आणि भर दरबारात तिच्या धाडसीपणा चं कौतुक केलं आणि म्हणूनच धाडसी भगिनी मुळे हे स्वराज्य अजिंक्य आहे असं मत व्यक्त केलं राजधानीच्या गडाला हिरकणी अस  नाव देऊन समस्त स्त्रीशक्तीला प्रेरणा देतात त्यांच्या शौर्याचे चिरस्थायी कौतुक करतात असेही शिवाजी महाराज राजांचे राजे-महाराजे होते

        इतिहासाच्या पानावर

          रयतेच्या मनावर         

    मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर      

             राज्य करणारा राजा म्हणजे

               राजा शिवछत्रपती....!!

महाराजांना अनेक नावे आतापर्यंत कोणत्या व्यक्तीला दिली नसतील किंवा एवढा पराक्रम गाजवलेल्या व्यक्ती संपूर्ण जगात आढळणार नाही अशी राजाधिराज छत्रपती शिवराय दुर्गपती गजअश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्नंश्रीपती अष्टावधानजागृत अष्टप्रधान वेष्टीत न्याय अलंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर पौढप्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंतस सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज श्रीमंत छत्रपती महाराज एवढेच नव्हे तर अशी अनेक नावे शिवाजी महाराजांना जगाने दिली आहेत

शिवाजी महाराजांचे निधन – Shivaji Maharaj Death

               शिवनेरीच्या शेतीचा वर उगवलेला वर्षांचे काळरात्र चिरून स्वराज्याच्या मंगल प्रकाशाने आसमंत तेजोमय बनवणारा शिवसुर्य म्हणजेच शिवाजी महाराज वयाच्या पन्नासाव्या वर्षी 3 एप्रिल 1680 या दिवशी जगाला अखेरचा निरोप देऊन अंतकरणात विलीन झाले आणि या दिवशी सह्याद्री ही थबकून गेला तो क्षण बघून सारा महाराष्ट्र गहिवरला होता.

असा हा राजा धीराज छत्रपती शिवाजी महाराजांना कोटी कोटी प्रणाम..!!

हे पण वाचा : हिंदी को इंग्लिश में ट्रांसलेट करें Online-Best Method 2021 


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कब्बड्डी या खेळाची माहिती | Kabaddi Information in Marathi

 आजच्या संगणक आणि मोबाईलच्या युगात मुलांचे मैदानी खेळ खेळण्याचे प्रमाण कमी झाले आहे त्यामुळे मुलांच्या आरोग्यावर याचा खूप परिणाम होत आहे 'सुदृढ आरोग्य हीच आपली खरी संपत्ती आहे 'आणि याचे महत्त्व दिवसेंदिवस अधिक ठळकपणे समोर येत आहे आपण लहानपणापासून "आरोग्य धनसंपदा"  हा श्लोक म्हणत आहोत आणि आपलं आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी व्यायाम मध्ये सातत्य ठेवावे लागते आणि ते ठेवणे आज-काल अवघड झाले आहे म्हणूनच यावर उत्तम उपाय म्हणजे खेळ .या जगात खेळ न आवडणारा माणूस विरळाअसेल.खेळ हे दोन प्रकारचे असतात, बैठे आणि मैदानी पण खेळ कोणताही असो त्याने मन आणि शरीर तंदुरुस्त राहते आपले कौशल्य विकसित होते त्यामुळे आज आपण कबड्डी या लोकप्रिय व राज्यस्तरीय स्तरावर खेळल्या जाणाऱ्या खेळाबद्दल माहिती जाणून घेऊया कबड्डीचा(हुतुतू) उगम- हुतुतू या   महाराष्ट्रीयन  शब्दापासून कबड्डी हा शब्द तयार झाला आहे कबड्डी हा सांघिक मैदानी खेळ आहे अनेक तज्ञ व जाणकारांचा मते महाभारतातील अभिमन्यू या थोर योध्याने या खेळाची सुरुवात केली होती असे मानले जाते तर या खेळाची सुमारे चार हजार वर्षांपासून ख्याती आहे प्रत्येक राज्याच्

संत तुकाराम महाराजांचे चरित्र | Sant Tukaram Information in Marathi

 तुकाराम महाराज हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील एक संत होते आज आपण संत तुकाराम यांच्या बद्दल माहिती जाणून घेणार आहोत चला तर जाणून घेऊयात संत तुकाराम यांची जीवनप्रवास जाणून घेउयात  तुकाराम महाराजांचा जन्म        महाराष्ट्रातील देहू या पावन क्षेत्री एका मोरे घराण्यात इसवी सन १६०८ रोजी वसंत माघ शुद्ध पंचमीला संत तुकाराम महाराजांचा जन्म झाला. तुकाराम महाराजांचे संपूर्ण नाव तुकाराम बोल्होबा आंबिले असे होते. वडिलांचे नाव बोल्होबा आंबिले व आईचे नाव कनकाई आंबिले असे होते. तुकारामांच्या वडीलांची शेतीभाती होती त्यांचे किराणा मालाचे दुकान सुद्धा होते. बोल्होबा म्हणजेच तुकारामांचे वडील अडल्या-नडल्यांना कर्ज देत असत.  बोल्होबा आंबिले यांना तीन अपत्ये होती पहिला सावजी मधले तुकाराम व कान्होबा पण तुकारामांचा मोठा भाऊ स्वभावाने विरक्त होता व कान्होबा सर्वात लहान असल्याने घराची संपूर्ण जबाबदारी तुकोबांवर होती. तुकोबांचे लग्न चौदाव्या-पंधराव्या वर्षी पुण्याचे आप्पाजी गुळवे यांची कन्या आवली (आवडी ) हिच्याशी प्रथम विवाह झाला, त्यानंतर त्यांच्यावर अचानक दुःखाचे डोंगर कोसळू लागले त्यांना अनेक प्राप

महात्मा गांधी- जीवन परिचय मराठी मध्ये ~ Mahatma Gandhi Information In Marathi

 आज आपण स्वातंत्र्य स्वतंत्र भारतात मुक्तपणे श्वास घेत आहोत, कारण की ते हुतात्म्यांनी व स्वातंत्र्यलढा यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी संपूर्ण जीवन समर्पित केले. त्या स्वातंत्र्यलढा पैकी एक आहेत आपले राष्ट्रपिता महात्मा गांधी, भारतमातेचे थोर सुपुत्र जगाला अहिंसेचे महान संदेश देणारे गांधीजी हे वंदनीय युगपुरुष होते. ते आपल्या कर्तृत्वामुळे महात्मा व राष्ट्रपिता अशा पदापर्यंत पोहोचले महात्मा गांधींचा जन्म          महात्मा गांधी या थोर राष्ट्रपिता जन्म 2 ऑक्टोबर १८६९ साली काठीयावाड पोरबंदर गुजरात येथे पुतळीबाई यांच्या पोटी झाला. गांधीजींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते, त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद गांधी व आईचे नाव पुतळीबाई गांधी असे होते, गांधीजी हे करमचंद यांच्या चौथ्या पत्नीचे म्हणजेच पुतळीबाईचे सुपुत्र आहेत आधीच्या तीन पत्नी या गर्भवती असतानाच मरण पावल्या .गांधीजींच्या आजोबाचे नाव उत्तम चंद उर्फ उत्ता गांधी असे होते, करमचंद गांधी हे गुजरातमधील पोरबंदर मध्ये दिवाण होते. धार्मिक वातावरणातील बालपणाचा मोठा प्रभाव गांधीजींच्या मनावर झालेला होता. विशेषता अहिंसा सहिष्णुता शाकाह