कब्बड्डी या खेळाची माहिती | Kabaddi Information in Marathi

 आजच्या संगणक आणि मोबाईलच्या युगात मुलांचे मैदानी खेळ खेळण्याचे प्रमाण कमी झाले आहे त्यामुळे मुलांच्या आरोग्यावर याचा खूप परिणाम होत आहे 'सुदृढ आरोग्य हीच आपली खरी संपत्ती आहे 'आणि याचे महत्त्व दिवसेंदिवस अधिक ठळकपणे समोर येत आहे आपण लहानपणापासून "आरोग्य धनसंपदा"  हा श्लोक म्हणत आहोत आणि आपलं आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी व्यायाम मध्ये सातत्य ठेवावे लागते आणि ते ठेवणे आज-काल अवघड झाले आहे म्हणूनच यावर उत्तम उपाय म्हणजे खेळ .या जगात खेळ न आवडणारा माणूस विरळाअसेल.खेळ हे दोन प्रकारचे असतात, बैठे आणि मैदानी पण खेळ कोणताही असो त्याने मन आणि शरीर तंदुरुस्त राहते आपले कौशल्य विकसित होते त्यामुळे आज आपण कबड्डी या लोकप्रिय व राज्यस्तरीय स्तरावर खेळल्या जाणाऱ्या खेळाबद्दल माहिती जाणून घेऊया

कबड्डीचा(हुतुतू) उगम-

हुतुतू या   महाराष्ट्रीयन  शब्दापासून कबड्डी हा शब्द तयार झाला आहे कबड्डी हा सांघिक मैदानी खेळ आहे अनेक तज्ञ व जाणकारांचा मते महाभारतातील अभिमन्यू या थोर योध्याने या खेळाची सुरुवात केली होती असे मानले जाते तर या खेळाची सुमारे चार हजार वर्षांपासून ख्याती आहे प्रत्येक राज्याच्या बोलीभाषा नुसार कबड्डी हा खेळ वेगवेगळ्या नावांनी प्रचलित आहे महाराष्ट्र व मध्य प्रदेश या राज्यात हुतुतू कबड्डी या नावाने प्रसिद्ध आहे तर कर्नाटक व तमिळनाडूमध्ये चाडूगुडू, केरळ मध्ये वांपिकली पंजाब मध्ये झबर गगने तर बंगालमध्ये दो-दो या नावाने हा खेळ प्रसिद्ध आहे इसवी सन १९३४ मध्ये या खेळाचे नियम तयार करण्यात आले व पुढे महाराष्ट्रातील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाने १९३६ मध्ये कबड्डी या खेळाच्या प्रसारासाठी बर्लिन देशात खेळला जाणाऱ्या ऑलिंपिक मध्ये प्रदर्शनीय सामना खेळला व तेव्हापासून या खेळाला चांगलीच प्रसिद्धी मिळाली इसवी सन १९३८ पासून या खेळाला भारताचे राष्ट्रीयत्व मिळाले व हा भारताचा राष्ट्रीय खेळ म्हणून ओळखला जातो हळूहळू कबड्डी हा खेळ दक्षिण आशिया,  भूतान, पाकिस्तान ,नेपाल, श्रीलंका, बांगलादेश, मलेशिया यांसारख्या देशात खेळू लागला. जपानसारख्या देशात प्रचलित होऊन तिथेही हा खेळ आनंदाने व उत्साहाने खेळला जाऊ लागला व अखेर १९५० रोजी पहिला अखिल भारतीय कबड्डी संघ तयार झाला हा खेळ वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या नावांनी व काही फरकाने खेळला जात होताच तरीपण या खेळायला कबड्डी या नावाने जगाला परिचित करण्याचे मुख्य काम महाराष्ट्र राज्याने केले म्हणून कबड्डी या नावाने हा खेळ जगविख्यात करण्याचे श्रेय महाराष्ट्राला द्यायला पाहिजे मराठी मातीतल्या माणसांनी अनेक प्रयत्न करून कबड्डी खेळातला विविधतेला सारून आपल्या राज्यात एकतेची भावना निर्माण केली आहे व कबड्डी या खेळाला  आंतरराष्ट्रीय पदावर नेण्याचे कार्यही मराठी माणसाने केले आहे म्हणून कबड्डी च्या खेळात महाराष्ट्राचे महत्त्वाचे स्थान आहे

कबड्डी (हुतुतू)चे नियम

सुरुवातीला हा खेळ फार काही काटेकोर नियमांनी नव्हता खेळला जात मैदानाचे दोन भाग एका रेषेने आखले की संपला नियम! पण यामुळे गोंधळ उडत गेला व गोंधळाची परिस्थिती निर्माण होत गेली म्हणून अखिल महाराष्ट्र शारीरिक शिक्षणाचे पहिले अधिवेशन १९३१ साली अकोला या ठिकाणी पार पाडले गेले भारतातील सर्व देशी खेळांच्या नियमा साठी या अधिवेशनात समिती नेमण्यात आली या समितीने १९३४ मध्ये कबड्डी या खेळासाठी काही नियम तयार केले व या नियमांना मान्यता मिळाली पुढे काही त्या नियमांमध्ये बदल करण्यात आला महाराष्ट्राचा समितीने तयार केलेल्या नियमानुसारच हा खेळ संपूर्ण भारतात खेळला जातो. कबड्डीचे नियम पुढील प्रमाणे

१) महिला व पुरुषांसाठी वेगळ्या प्रकारचे मैदान असते पुरुषांसाठी १२.५० मी .बाय १० मी व महिलांसाठी ११ मी .बाय ८ मी असे आयताकृती असलेले क्रीडांगण असले पाहिजे 

२) क्रीडांगण हे बारीक चाललेल्या माती व शेंड खताने मैदान करून बनवले गेले पाहिजे

३) पूर्वीच्या खुल्या मैदानात खेळला जाणारा हा खेळ आता बंदिस्त जागेत किंवा मॅटवर खेळाला जातो

४) मैदानाचे एक रेषा खून दोन भाग केले जाते दोन्ही प्रतिस्पर्धी एका एका बाजूला थांबले असले पाहिजेत

५) चढाया करताना कबड्डी हा शब्द खेळाडूस उच्चारण करावेच लागते असे न केल्यास खेळणाऱ्या खेळाडूस फाऊल म्हणजेच बाद करण्यात येतो

कबड्डी(हुतुतू) खेळण्याचे एकमेव पद्धत-

कबड्डी या खेळात दोन वेगवेगळ्या टीम वेगवेगळ्या विभागातून असतात व एकमेकांचे प्रतिस्पर्धी असतात प्रत्येक संघात बारा खेळाडू असतात या खेळात दोन संघ आपापला खेळाडू आळीपाळीने प्रतिस्पर्धी संघावर चढाया करण्यासाठी एक खेळाडू पाठवतो प्रत्यक्ष सामना असताना मैदानात फक्त सात खेळाडू असतात बारापैकी उरलेले पाच खेळाडू बदली खेळाडू म्हणून खेळवले जातात बदली म्हणजे एखाद्या खेळाडूला जखम झाली किंवा काही अकस्मात अडचण आल्यास त्या खेळाडूच्या बदल्यात बदली खेळाडू ला खेळवले जाते चढाया करण्यास जाताना कबड्डी हा शब्द बोलणे अनिवार्य असतं .पुरुषांच्या कबड्डी सामन्यासाठी वीस मिनिट तर महिलांच्या सामन्यासाठी पंधरा मिनिटात दोन डाव खेळवले जातात

कबड्डी खेळण्याचे फायदे : 

𒊹︎︎︎ शरीर निरोगी व स्वस्थ राहते

𒊹︎︎ आपल्या शरीरातील कौशल्य  ताकद व चतुराई पण वाढते

𒊹︎︎︎  सामूहिक खेळामुळे सांघिक व मदतनीस भावना वाढते

𒊹︎︎︎  निर्णय क्षमता वाढते

𒊹︎︎︎ परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी धेर्य निर्माण होते

प्रो कबड्डी या सामन्यात मुळे गेल्या काही वर्षात या खेळाला जणू काही नवीन संजीवनीच प्राप्त झाले आहे मोठे मोठे दिग्दर्शक ,कलाकार कबड्डीचे टीम विकत घेत आहेत व यामुळे ही पारंपरिक पद्धतीने खेळली जाणारी कबड्डी जगली व तगली असं वाटायला लागलं आहे पण प्रो कबड्डी सामने असल्यामुळे अखिल भारतीय संघ धोक्यात येत आहेत कबड्डी हा असा खेळ आहे ज्यामध्ये महिला व पुरुष दोन्ही भारतीय संघाने भारतासाठी विश्वकप जिंकुन आणला आहे.