मुख्य सामग्रीवर वगळा

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची संपूर्ण माहिती | Lokmanya Tilak information in marathi

 असंतोषाचे जनक स्वातंत्र्य चळवळीतील जाज्वल्य विचारवंत थोर क्रांतिकारक आणि स्वराज्यातून सुराज्याचा ओंकार भरणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक भारतीय इतिहास संस्कृती हिंदूधर्म गणित आणि भूगोल विज्ञानाचे विद्वान लोकमान्य टिळकांनी इंग्रजांविरुद्ध मोठा संघर्ष केला लोकमान्य टिळकांना भारताचा प्रधान आर्किटेक्ट म्हटलं जातं

लोकमान्य टिळकांचे बालपण

लोकमान्य टिळकांचा जन्म रत्नागिरी शहरातील सदोबा गोरे यांच्या घरात 23 जुलै 1856 रोज़ी झाला । त्यांचे खरे नाव केशव असे होते । पण त्यांना लहानपणी बाळ असे म्हणत । त्यामुळे पुढेही बाळ हेच त्यांचे नाव पडले । बाळच्या वडिलांचे नाव गंगाधरपंत आणि आईचे नाव पार्वतीबाई होते । गंगाधरपंतांची शेती होती । पण शेतीच्या उत्पन्नावर घरखर्च भागणे शक्य नव्हते, म्हणून त्यांनी शिक्षकाची नोकरी धरली । त्या वेळेस त्यांना महिन्याला फक्त पाच रुपये पगार मिळायचा गंगाधरपंत गणित व संस्कृत विषयाचे गाढे पंडित होते त्यामुळे या दोन्ही विषयात बाळ पण चांगलेच पारंगत झाले त्यांना बालपणापासूनच वाचनाची आवड होती संस्कृत पुस्तके वाचून शब्दांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न ते करीत असत आणि लिहिलेले कादंबरी नावाचे एक सुप्रसिद्ध कथा काव्य गंगाधरपंत वाचत असत बाळाने ते पुस्तक वाचण्यास मागितले गंगाधर पंतांना आश्चर्य वाटले की एवढासा दहा वर्षाचा मुलगा हे पुस्तक काय वाचणार म्हणून गंगाधर पंतांनी त्याची परीक्षा घ्यायची ठरवली त्यांनी बाळा समोर एक अट ठेवली ती ही की ते पुस्तक देणार पण त्यांनी दिलेला अवघड गणित सोडवून दाखवलं तर लोकमान्य टिळक तयार झाले त्याने पाटी-पेंसिल घेतली व गणित सोडण्यास पूर्ण दिवस लावला शेवटी त्यांनी ते गणित सोडवले त्यामुळे गंगाधरपंत व पार्वतीबाई खूप आनंदी झाले व गंगाधरपंताना ते पुस्तक बाळाला द्यावे लागले.

लोकमान्य टिळकांचे शिक्षण

लोकमान्य टिळकांना त्यांच्या आईचे प्रेम खूप कमी मिळाले ते जेमतेम दहा वर्षाचा असताना म्हणजे इसवी सन 1866 साली त्यांची आई वारली। मॅट्रिकच्या आधी म्हणजे 1871 सालीच वयाच्या पंधराव्या वर्षी लोकमान्य टिळकांचे लग्न सत्यभामाबाई सोबत झाले लग्नानंतर ते मॅट्रिक झाले व लगेच काही दिवसानंतर त्यांच्या डोक्यावरून वडिलांचे छत्र हरवले असे लोकमान्य टिळक शिकत-शिकत 1872साली मॅट्रिक पूर्ण केली मॅट्रिक शिकवून ते शांत नाही बसले त्यांच्या काळात खूप कमी मुले मॅट्रिक शिकत असत पण ते थांबले नाहीत मॅट्रिक झाल्यानंतर त्यांनी कॉलेजला जायचं ठरवलं शिक्षणासाठी लोकमान्य टिळक 1873 साली पुण्याला येऊन डेक्कन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला कॉलेजमध्ये असताना लोकमान्य टिळक अभ्यासाबरोबरच सुदृढ शरीरासाठी व्यायामही करायचे त्यांनी व्यायामाने चांगले खान पानाने बलदंड शरीर कमावले ते 1876 साली डेक्कन कॉलेज मधूनच बी. एच. ची परीक्षा पास झाले व पुढे एम. ए ।करून कॉलेजमध्ये प्रोफेसर व्हावे असे त्यांना वाटले पण तेव्हा ते त्यांना जमले नाही

केसरी ची स्थापना

1880 साली टिळक आणि त्यांच्या मित्रमंडळींनी 'केसरी' नावाचे पत्र चालू केले । त्याबरोबर 'मराठा' हेही इंग्रजी पत्र चालू केले । खर्चासाठी लागणारा सगळाच पैसा जवळ नव्हता । मग टिळकांनी वकिलीच्या अभ्यासाचे वर्ग चालवायचे ठरवले आणि ते वर्ग चालवून पैसा साठवू लागले । वर्तमानपत्रे छान चालू लागली । अन्यायाविरुद्ध जोरदार टीका करायला छान साधन मिळाले । त्यानंतर त्यांनी 'फर्ग्युसन कॉलेज' ही काढले आणि तेथेही त्यांनी उत्तम प्रकारे शिकवण्याचे काम केले । टिळकांचे लेख प्रसिद्ध होऊ लागले । त्यांची भाषा, त्यांचे विचार लोकांना पटू लागले । जनतेमध्ये उत्साह आला । परकीय सत्तेबद्दल चीड उत्पन्न झाली आपण एकत्र आलो तर या ब्रिटिशांविरुद्ध लढू शकू असा आत्मविश्वास लोकांमध्ये निर्माण झाला । लोकमान्य टिळकांचा केसरीतील लेख वाचण्यासाठी लोक उत्सुक असायचे, याची जाणीव लोकमान्यांना होती । 'केसरी' साठी टिळकांनी वाटेल ते करायला मागेपुढे पाहिले नाही । वेळ पडली तर छापखान्यामध्ये ते स्वत: खिळे जुळवण्यासाठी बसायचे । टिळक कर्तव्याला फार जपायचे । कर्तव्यापुढे ते कुठल्याही गोष्टीला मागेपुढे बघायचे नाहीत ।

प्लेग विरोधी फवारणीस विरोध

इसवी सन 1897 मध्ये महाराष्ट्र मध्ये गाठीचा प्लेग ची भयंकर साथ आली उंदीर नष्ट करण्यासाठी सरकारने फवारणी सुरू केली व या मोहिमेला पुणेकरांनी नकार दिला आणि हा विरोध मोडून काढण्यासाठी पुण्याचा ब्रिटिश रेसिडेंट वॉल्टर चार्लस र**यांनी लष्कराची मदत घेतली घरात घुसून जबरदस्ती फवारणी करून साथीचा रोग पसरल्याचे सांगून घरातील कपडेलत्ते सरस जाळू लागले यामुळे पुण्यात हाहाकार उडाला ब्रिटिश बँड साहेब घरे आहेत अशी भूमिका लोकांनी मांडले आणि या भूमिकेला लोकमान्य टिळकांनी केसरी या वृत्तपत्राद्वारे उचलून धरले.

बंगालची फाळणी विरुद्ध लढा मंडालेच्या कारागृहात तुने टिळकांना 8 जून 1914 रोज़ी सुटका मिळाली त्यानंतर त्यांनी आपले काम पुन्हा पूर्ववत सुरू केले काँग्रेसमध्ये दुफळी माजून भयंकर मतभेद निर्माण झाले होते टिळकांनी त्यांना एकत्र आणण्यासाठी पराकोटीचे प्रयत्न केले पण त्यांना अजिबात यश आले नाही म्हणून त्यांनी स्वतंत्र अशी शक्तिमान संघटना निर्माण केली यालाच होमरूल लीग संघटना असे म्हणतात स्वराज्य प्राप्ति हे या संघटनेचे मुख्य ध्येय व कार्य होय मंडालेच्या तुरुंगात गीतारहस्य हा ग्रंथ लोकमान्य टिळकांनी लिहिला.

सार्वजनिक उत्सवांची सुरुवात

लोकमान्य टिळकांनी 1894 साली विंचूरकर वाड्यात राजकीय जनजागृतीसाठी गणेशोत्सवाची सुरुवात केली त्यानंतर पुढे 1896 मध्ये टिळकांनी शिवाजी महाराजांच्या जयंतीला उत्सवाचे स्वरूप दिला स्वातंत्र्यलढ्याच्या पार्श्वभूमी मुळे शिवजयंती व गणेशोत्सव साजरा करण्यात येत होते त्यामुळे या सणाला सामाजिक आणि व्यापक रूप मिळाले या उत्सवामुळे लोकमान्य टिळक समाजामध्ये औचित्य साधून तरुणांमध्ये राष्ट्रतेज निर्माण करण्याचे कार्य करत होते गणेशोत्सव शिवजयंती मुळे राष्ट्रवादी विचारांचा प्रसार होऊ लागला लोकमान्य टिळकांनी या उत्सवांच्या उपयोग ब्रिटिशांना होण्यासाठी चांगला वापर केला 1904 ते 1905 या काळात ब्रिटिशांना कल्पनासुद्धा नव्हती की ते गेल्या कित्येक वर्षांपासून टिळक गणेशोत्सवाचा वापर राष्ट्रवादाचा संदेश पसरवण्यासाठी करत होते ती परवानगी घ्यायचे गणेशोत्सवासाठी व राष्ट्रवादीचे भाषण करायचे त्या काळात भाषण करण्यासाठी परवानगी लागायचे पण गणेशोत्सव साजरा करण्यासाठी अजिबात ब्रिटिशांची परवानगी घ्यायची गरज नव्हती पुढे त्यांना राष्ट्रवादाचा प्रसार केल्यामुळे मंडालेच्या तुरुंगात सहा वर्षांचा तुरुंगवास झाला.

लोकमान्य टिळकांचा मृत्यू

1 ऑगस्ट 1920 रोज़ी लोकमान्य टिळक या थोर जहालवादी नेत्याचा मृत्यू झाला

लोकमान्य टिळकांची प्रेरणादायी विचार

1) स्वातंत्र्य म्हणजे विष, स्वराज्य म्हणजे दुध

2) पुढे जाणाऱ्याला मागे खेचू नका ।

3) स्वर्गापेक्षा चांगल्या पुस्तकांचे मी अधिक स्वागत करीन । कारण पुस्तके जेथे असतील तिथे स्वर्ग निर्माण होत माणसाने माणसाला भ्यावे ही शरमेची गोष्ट आहे

4) जुलूम सहन करणे म्हणजे सोशिकपणा नव्हे तो परमार्थही नव्हे । ती फक्त पशुवृत्ती होय

5) गांधीजी उद्याचे महापुरुष ।

6) परमेश्वर अस्पृश्यता मानीत असेल तर मी परमेश्वरालाच मानणार नाही ।

7) आयुष्य हा कोरा चेक आहे । त्यावर वाटेल तेवढी सुखाची रक्कम लिहिणे माणसाच्या मनावर अवलंबून आहे । मात्र ती आशेच्या शाईने लिहून हास्याच्या गदाने टिपली पाहिजे

हे पण जाणून घेऊयात : 

  1. संत तुकाराम महाराजाची संपूर्ण माहिती 
  2. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण  माहिती

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कब्बड्डी या खेळाची माहिती | Kabaddi Information in Marathi

 आजच्या संगणक आणि मोबाईलच्या युगात मुलांचे मैदानी खेळ खेळण्याचे प्रमाण कमी झाले आहे त्यामुळे मुलांच्या आरोग्यावर याचा खूप परिणाम होत आहे 'सुदृढ आरोग्य हीच आपली खरी संपत्ती आहे 'आणि याचे महत्त्व दिवसेंदिवस अधिक ठळकपणे समोर येत आहे आपण लहानपणापासून "आरोग्य धनसंपदा"  हा श्लोक म्हणत आहोत आणि आपलं आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी व्यायाम मध्ये सातत्य ठेवावे लागते आणि ते ठेवणे आज-काल अवघड झाले आहे म्हणूनच यावर उत्तम उपाय म्हणजे खेळ .या जगात खेळ न आवडणारा माणूस विरळाअसेल.खेळ हे दोन प्रकारचे असतात, बैठे आणि मैदानी पण खेळ कोणताही असो त्याने मन आणि शरीर तंदुरुस्त राहते आपले कौशल्य विकसित होते त्यामुळे आज आपण कबड्डी या लोकप्रिय व राज्यस्तरीय स्तरावर खेळल्या जाणाऱ्या खेळाबद्दल माहिती जाणून घेऊया कबड्डीचा(हुतुतू) उगम- हुतुतू या   महाराष्ट्रीयन  शब्दापासून कबड्डी हा शब्द तयार झाला आहे कबड्डी हा सांघिक मैदानी खेळ आहे अनेक तज्ञ व जाणकारांचा मते महाभारतातील अभिमन्यू या थोर योध्याने या खेळाची सुरुवात केली होती असे मानले जाते तर या खेळाची सुमारे चार हजार वर्षांपासून ख्याती आहे प्रत्येक राज्याच्

संत तुकाराम महाराजांचे चरित्र | Sant Tukaram Information in Marathi

 तुकाराम महाराज हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील एक संत होते आज आपण संत तुकाराम यांच्या बद्दल माहिती जाणून घेणार आहोत चला तर जाणून घेऊयात संत तुकाराम यांची जीवनप्रवास जाणून घेउयात  तुकाराम महाराजांचा जन्म        महाराष्ट्रातील देहू या पावन क्षेत्री एका मोरे घराण्यात इसवी सन १६०८ रोजी वसंत माघ शुद्ध पंचमीला संत तुकाराम महाराजांचा जन्म झाला. तुकाराम महाराजांचे संपूर्ण नाव तुकाराम बोल्होबा आंबिले असे होते. वडिलांचे नाव बोल्होबा आंबिले व आईचे नाव कनकाई आंबिले असे होते. तुकारामांच्या वडीलांची शेतीभाती होती त्यांचे किराणा मालाचे दुकान सुद्धा होते. बोल्होबा म्हणजेच तुकारामांचे वडील अडल्या-नडल्यांना कर्ज देत असत.  बोल्होबा आंबिले यांना तीन अपत्ये होती पहिला सावजी मधले तुकाराम व कान्होबा पण तुकारामांचा मोठा भाऊ स्वभावाने विरक्त होता व कान्होबा सर्वात लहान असल्याने घराची संपूर्ण जबाबदारी तुकोबांवर होती. तुकोबांचे लग्न चौदाव्या-पंधराव्या वर्षी पुण्याचे आप्पाजी गुळवे यांची कन्या आवली (आवडी ) हिच्याशी प्रथम विवाह झाला, त्यानंतर त्यांच्यावर अचानक दुःखाचे डोंगर कोसळू लागले त्यांना अनेक प्राप

महात्मा गांधी- जीवन परिचय मराठी मध्ये ~ Mahatma Gandhi Information In Marathi

 आज आपण स्वातंत्र्य स्वतंत्र भारतात मुक्तपणे श्वास घेत आहोत, कारण की ते हुतात्म्यांनी व स्वातंत्र्यलढा यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी संपूर्ण जीवन समर्पित केले. त्या स्वातंत्र्यलढा पैकी एक आहेत आपले राष्ट्रपिता महात्मा गांधी, भारतमातेचे थोर सुपुत्र जगाला अहिंसेचे महान संदेश देणारे गांधीजी हे वंदनीय युगपुरुष होते. ते आपल्या कर्तृत्वामुळे महात्मा व राष्ट्रपिता अशा पदापर्यंत पोहोचले महात्मा गांधींचा जन्म          महात्मा गांधी या थोर राष्ट्रपिता जन्म 2 ऑक्टोबर १८६९ साली काठीयावाड पोरबंदर गुजरात येथे पुतळीबाई यांच्या पोटी झाला. गांधीजींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते, त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद गांधी व आईचे नाव पुतळीबाई गांधी असे होते, गांधीजी हे करमचंद यांच्या चौथ्या पत्नीचे म्हणजेच पुतळीबाईचे सुपुत्र आहेत आधीच्या तीन पत्नी या गर्भवती असतानाच मरण पावल्या .गांधीजींच्या आजोबाचे नाव उत्तम चंद उर्फ उत्ता गांधी असे होते, करमचंद गांधी हे गुजरातमधील पोरबंदर मध्ये दिवाण होते. धार्मिक वातावरणातील बालपणाचा मोठा प्रभाव गांधीजींच्या मनावर झालेला होता. विशेषता अहिंसा सहिष्णुता शाकाह