महात्मा गांधी- जीवन परिचय मराठी मध्ये ~ Mahatma Gandhi Information In Marathi

 आज आपण स्वातंत्र्य स्वतंत्र भारतात मुक्तपणे श्वास घेत आहोत, कारण की ते हुतात्म्यांनी व स्वातंत्र्यलढा यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी संपूर्ण जीवन समर्पित केले. त्या स्वातंत्र्यलढा पैकी एक आहेत आपले राष्ट्रपिता महात्मा गांधी, भारतमातेचे थोर सुपुत्र जगाला अहिंसेचे महान संदेश देणारे गांधीजी हे वंदनीय युगपुरुष होते. ते आपल्या कर्तृत्वामुळे महात्मा व राष्ट्रपिता अशा पदापर्यंत पोहोचले

महात्मा गांधींचा जन्म

         महात्मा गांधी या थोर राष्ट्रपिता जन्म 2 ऑक्टोबर १८६९ साली काठीयावाड पोरबंदर गुजरात येथे पुतळीबाई यांच्या पोटी झाला. गांधीजींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते, त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद गांधी व आईचे नाव पुतळीबाई गांधी असे होते, गांधीजी हे करमचंद यांच्या चौथ्या पत्नीचे म्हणजेच पुतळीबाईचे सुपुत्र आहेत आधीच्या तीन पत्नी या गर्भवती असतानाच मरण पावल्या .गांधीजींच्या आजोबाचे नाव उत्तम चंद उर्फ उत्ता गांधी असे होते, करमचंद गांधी हे गुजरातमधील पोरबंदर मध्ये दिवाण होते. धार्मिक वातावरणातील बालपणाचा मोठा प्रभाव गांधीजींच्या मनावर झालेला होता. विशेषता अहिंसा सहिष्णुता शाकाहार इतरांबद्दल दया व करुणा या तत्त्वांचे बीज लहानपणीच रोवले गेले. गांधीजींच्या मनावर त्यांच्या आईमुळे जैन संकल्पनांचा व प्रधान चा प्रभाव होता. प्राचीन वाड्मयातील श्रावण बाळ आणि हरिश्चंद्र या दोन कथा मुळे महात्मा जीवनावर परिणाम झालेला होता. त्यांनी स्वतःच्या आत्मचरित्रातून ही कबुली दिली आहे. की अगणित वेळा  मी हरिश्चंद्र सारखा वागला असेल गांधीजी सत्य प्रेमी होते आणि हा प्रभाव हरिश्चंद्र मुळे त्यांच्यावर पडला होता.

         इसवी सन १८८३ मध्ये गांधीजी १४ वर्षाच्या असताना त्यांचा विवाह १३ वर्षीय कस्तुरबा माखनजी यांच्या बरोबर झाला. लग्नानंतर कस्तुरबांना सगळे प्रेमाने बा असे  म्हणत असत, गांधीजींचे वय १५ वर्ष झाल्यानंतर त्यांना चार अपत्ये झाली. हरीलाल मणिलाल व त्यानंतर काही काळानंतर रामदास देवदास अशीच होती, पण इसवीसन १८८५ मध्ये करमचंद गांधी यांचे निधन झाले. गांधीजींनी लग्नानंतर भाव नगर मधील श्यामदास कॉलेजमधून मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली, त्यांच्या घरच्यांची इच्छा होते की गांधीजी ने वकिली करावेत. पण ते वकिली करण्यास नाखूष होते पण तरीही इसवीसन १८८८ मध्ये माध्यमिक शालेय शिक्षण पूर्ण करून वयाच्या एकोणिसाव्या वर्षी गांधीजी वकिलीचे शिक्षण घेण्यासाठी इंग्लंडमध्ये लंडन युनिव्हर्सिटी कॉलेज मध्ये गेले. इंग्लंडला जाण्याआधी त्यांनी आपल्या आईला जैन प्रभावामुळे मांस, बाई व मद्य या गोष्टीपासून दूर राहण्याचे वचन दिले आणि ते त्यांनी कटाक्षाने पाळले सुद्धा !.

गांधीजींना तेथील शाकाहारी जेवणाची सपक चव आवडली नाही म्हणून जोपर्यंत त्यांना भारतीय चव असलेली दुर्मिळ खानावळ सापडली नाही, तोपर्यंत ते कित्येक दिवस उपाशी राहिले, गांधीजींनी इनर टेम्पल या गावी राहून बॅरिस्टर साठी कायदा व न्याय शास्त्राचा मुख्यता अभ्यास केला. इंग्लंडमध्ये ते कायद्याचा अभ्यास करून ते बॅरिस्टर झाले १८९१ ला बॅरिस्टर ही पदवी घेऊन गांधीजी आपल्या मायदेशी भारतात परतले, ते जेव्हा इंग्लंड मध्ये शिकण्यासाठी गेल्या असताना त्या काळात त्यांच्या आई पुतळीबाई चे निधन झाले होते. ही गोष्ट त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना सांगितले नाही म्हणून त्यावेळी ते  खूप दुःखी झाले होते.

हे पण वाचा :

दक्षिण आफ्रिका

        गांधीजींनी आपल्या आयुष्याची तब्बल ११ वर्षे दक्षिण आफ्रिकेतील लोकांच्या न्यायासाठी व भारतातील लोकांबद्दल केला जाणारा वंशभेद इत्यादी गोष्टींसाठी लढण्यात घालवली. दक्षिण आफ्रिकेत गांधीजींनी राजकीय दृष्टिकोन नैतिकता आणि राजकीय नेतृत्व इत्यादी कौशल्ये विकसित केली गांधीजींना तेथे गोरे व काळे लोकांबद्दल असणाऱ्या भेदभावाला व भारतीयांना दिली जाणारी असमान वागणूक यांना मुख्यता सामोरे जावे लागले. गांधीजीं जवळ पहिल्या वर्गाचे तिकीट असतानासुद्धा पीटरमारित्झबर्ग मध्ये रेल्वे अधिकाऱ्यांनी भारतीय असल्यामुळे त्यांना तिसऱ्या वर्गाच्या डब्यात बसण्यास सांगितले, पण गांधीजींना त्यांना स्पष्ट नकार दिला. म्हणून रेल्वे अधिकाऱ्यांनी त्यांना रेल्वेच्या बाहेर ढकलून दिले. ती संपूर्ण रात्र त्यांनी रेल्वेच्या फलाटावर काढले गांधीजी त्या रेल्वे अधिकाऱ्यांना अद्दल घडू शकले असते. पण त्यांना सूड भावाने अद्दल घडवायची नव्हती तर या अन्यायकारक व्यवस्थेला बदलण्याचा त्यांचा हेतू होता.

स्वातंत्र्य संग्राम

         इसवी सन 1915 मध्ये गांधीजी कायमचे मायदेशी परतले, त्यांचे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय राष्ट्रवादी संघटक जिओ रिस्ट अशी ख्याती होती. भारतात परतल्यानंतर गोपाळकृष्ण गोखले यांनी गांधीजींना खऱ्या अर्थी राजकारण व समस्यांशी परिचय करून दिला. गोपाळ गोखले हे काँग्रेसच्या प्रमुख पदी नेते होते. असंतुलन पडे काम करणारे राजकीय नेता म्हणून ते ओळखले जायचे. गोपाळ गोखले आजही राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु आहेत, गांधीजींनी गोखल्यांच्या ब्रिटिश आधारित परंपरांवर उदार दृष्टिकोन अनुसरला 1920 मध्ये लोकमान्य टिळकांच्या मृत्यूनंतर गांधीजीनी राष्ट्रीय सभेचे प्रमुख पदी येऊन काँग्रेसचे नेतृत्व केले. पुढे १९३९ च्या सप्टेंबर मध्ये व्हॉइस रॉय ने जर्मनी विरुद्ध युद्ध जाहीर केले. तेव्हा गांधींनीआणि ब्रिटिशांनी सरकारचा पाठिंबा काढून टाकले. गांधींनी तत्काळ स्वराज्याची मागणी करेपर्यंत काँग्रेसच्या नेत्यांना व लाखो लोकांना तुरुंगात डांबले गेले शेवटी ब्रिटिश सरकारने १९४७ रोजी भारताला स्वतंत्र जाहीर केले. गांधीजीनीं भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामात महत्त्वाची भूमिका निभावली 

गांधीजींची तत्वे

       गांधीजी नी ११ तत्त्वांचा स्वीकार आपल्या जीवनात केला होता. ती म्हणजे सत्य ,अहिंसा, अस्तेय ,ब्रम्हचर्य, अपरिग्रह, शरीरश्रम ,आस्वाद, निर्भयता ,सर्वधर्म समभाव स्वदेशी ,अस्पृश्यतेचा त्याग . त्यांनी प्रथम निर्भयता हे तत्त्व स्वतः वर लागू केले,  कारण निर्भयता असेल तरच बाकीच्या गोष्टी साध्य होतील गांधीजींनी सत्याच्या शोधासाठी संपूर्ण आयुष्य अर्पण केले त्यांचे आत्मचरित्र "माझे सत्याचे प्रयोग" या नावाखाली आहे त्यांनी सत्य हेच परमेश्वर आहे हे तत्व लोकांना दिले, अहिंसेचा राजकीय स्तरावर अवलंब करणारे गांधीजी हे पहिले व्यक्ती होते हिंदू,जैन, ज्यू,बौद्ध या इत्यादी धर्मात त्यांनी अहिंसेच्या तत्वाचा विस्तार केला आहे.

गांधीजीं चे लेखन  

          महात्मा गांधीजींनी आपल्या आयुष्यात विउक लेखन केले त्यांनी अनेक वर्ष वर्तमानपतत्रांचे संपादन केले गुजराती हिंदी इंग्रजी इत्यादी भाषेत वर्तमानपत्रे छापली दक्षिण आफ्रिकेत असताना इंडियन ओपिनियन ,भारतातील इंग्रजी भाषेतील यंग इंडिया गुजराती मासिक या वृत्तपत्रांचा समावेश आहे. गांधीजींनी इंडियन होम ही राजकीय पुस्तिका व आपले आत्मचरित्र "माझे सत्याचे प्रयोग" ही महत्त्वाची पुस्तके लिहिली

गांधीजी नीं लिहिलेली पुस्तके 

१) Indian Home Rule(हिंद स्वराज्य)

२) गांधीजी विचार दर्शन-अहिंसाविचार

३) गांधीजी विचार दर्शन-राजकारण

४) गांधीजी विचार दर्शन-सत्याग्रह प्रयोग

५) गांधीजी विचार दर्शन-सत्याग्रह विचार

६) गांधीजी विचार दर्शन-सत्याग्रहाची जन्मकथा

७) गांधीजी विचार दर्शन-हरिजन

८) नैतिक धर्म

९) भगवतगीता(गांधीजींच्या चिंतनातून)

१०) माझ्या स्वप्नांचा भारत 

गांधीजींचे मृत्यू

३० जानेवारी १९४८ ला दिल्लीच्या बिर्ला भवनच्या बागेतून फिरत असताना नथुराम गोडसे याने ब्रेट मॉडेलच्या पिस्तूलीने गांधीजींवर गोळी झाडली व गांधीजी तिथेच ठार झाले. या अगोदर ही नथुराम गोडसेने गांधीजींवर जीव घेना हल्ला केला होता पण तो यशस्वी झाला नाही त्याचे असे मत होते की पाकिस्तानला पैसे देऊन भारताला दुबळे करणारे गांधीजी आहेत म्हणून त्यांच्यावर त्यादिवशी गोळीबार केले व गांधीजी ठार मारले गेले.

हे पण वाचा :

 गोडसे व त्याच्या सहकारी वर कोर्टात खटला दाखल करून त्यांना दोषी ठरवण्यात आले व त्यांना 15 नोव्हेंबर 1949 ला फाशी देण्यात आली गांधीजींनी भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात खूप मोठी भूमिका निभावली पण त्यांना भारताचे स्वातंत्र्य बघायलाच मिळाले नाही जर गांधीजी नसते तर आपण आज गुलामगिरीत असलो असतो गांधीजींची समाधी राजघाट या ठिकाणी आहे.