मुख्य सामग्रीवर वगळा

माझी आई [ निबंध ] मराठी निबंध | Mazi Aai Marathi Nibandh

मित्रानो आई ही आपल्या आयुष्यातील अशी व्यक्ती आहे जी आपलं संगोपन आणि पालनपोषण करते. आपल्या तोंडातील पहिला जो शब्द येतो तो म्हणजे आई. तर आजच्या ह्या पोस्ट मध्ये आपण माझी आई बद्दल निबंध लिहून  घेणार आहोत  

माझी आई [ निबंध ] मराठी निबंध | Mazi Aai Marathi Nibandh

 आई माझी मायेचा सागर

दिला तिने जीवना आधार

          कोठेही न मागता भरभरून मिळालेल् दान म्हणजे आई.  विधात्याच्या कृपेचा निर्भय वरदान म्हणजे आई आई ही वात्सल्याचं सागर आहे आईला जननी माऊली माय वात्सल्य अशी अनेक नावे आहेत. आई जगात सर्वश्रेष्ठ आहे तिच्यासारखं प्रेम माया आपल्यावर कोणीच करू शकत नाही आई या शब्दापासून आयुष्याची सुरुवात होते 

                             असं म्हणतात आईने दुवा दिली तर वेळ काय नशीब पण बदलतं हे वाक्य अगदी खरं आहे. मरण यातना सहन करून जी आपल्याला जीवन यात्रा सुरू करून देते ती म्हणजे आई. जगात असे एकच न्यायालय आहे की जेथे सर्व गुन्हे माफ होतात ते म्हणजे आई.  आपल्या हजार चुकांना माफ करून जवळ घेणारी आपली आईच असते.  जगात दुसरं कोणीही आपल्याला माफ करत नाही अशीच माझी आई मनाने खुप प्रेमळ आणि निर्मळ आहे.

हे पण जाणून द्या : राजमाता जिजाबाईं विषयी थोडक्यात महत्वपुर्ण माहिती

   मी तिच्या पोटी जन्मोजन्मी जन्म घ्यावी अशी मी नेहमी प्रार्थना करते माझ्या प्रत्येक यशामागे ती आहे, आज जर ती नसती तर माझं अस्तित्वच नसतं, कुटुंबाचे संपूर्ण जबाबदारी आईवर असते आईने जर कुटुंब नावाच्या बोटीला जर स्वतःच्या हाताने वलव्हल नाही तर हे बोट पुढे  जाऊ शकत नाही, म्हणूनच आई चे कार्य हे खूप महान आहे साने गुरुजींनी तर आपल्या आईवर पूर्ण पुस्तक लिहिले त्या पुस्तकाचे नाव श्यामची आई. बोट धरून चालायला शिकवते धडपडल्यावर  उचलते आपला आधारस्तंभ बनते का ?

                                                                   तर आपल्या मुलाने धडपडू नये त्याने नेहमी यशाची उच्च शिखर गाठावे अशी तिची इच्छा असते ती नेहमी आपल्या मुलांसाठी झटत असते माझी आई माझ्या पाठीशी नेहमी खंबीरपणे उभी असते. ती म्हणते की मी तुझ्या पाठीशी तुझ्या सावलीसारखी नेहमीच असेल आईला स्वयंपाक घरचा गुरु पण म्हणता येईल, कारण ती नेहमीच सगळ्यांसाठी नाश्ता, जेवण बनवते माझी आई उत्तम गृहिणी सुद्धा आहे आणि घरात जर कोण आजारी पडलं तर सगळ्यात जास्त काळजी आईला असते .आई काय काय करते? बापरे! आईचे हे किती आपल्यावर उपकार !आईचे घरात पाय पडताच सगळं घर आनंदाने बहरून जात सगळ्यांच्या डोक्यावरचं टेन्शन कमी होतं. का? तर आई आली आहे आता आम्ही टेन्शन मुक्त असं म्हणून सगळ्यांना आनंद होतो घराला मंदिर बनवणारे माझी आई खूप महान आहे तिचे ऋण मी कधीच फेडू शकत नाही

    "आई म्हणजे मंदिराचा उंच कळस

        आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस 

  आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी

     आई म्हणजे वाळवंटात प्याव अस थंड पाणी "

     खरंच आई विना आपण आयुष्याची कल्पनाच करू शकत नाही, ती नसती तर आज आपण जन्मलोच  नसतो आपलं काहीच अस्तित्व नसतं. जसे वृक्ष स्वतःहून ऊन झेलून इतरांना सावली देतात तसेच आई दुःख देऊन आपल्याला माया देते. आ म्हणजे आत्मा ई म्हणजे ईश्वर असे आत्मारुपी ईश्वर म्हणजे आई.

                आई म्हणजे प्रेम,हिम्मत आई म्हणजे  मैत्रीण ,डॉक्टर आई म्हणजे दुनिया ,सुकून. आई बद्दल काय लिहू आणि किती लिहू साऱ्या जगता चे शब्द तिच्यापुढे कमी आहे आपण तिचे उपकार तिचे वर्णन कोणत्या शब्दात करू शकत नाही आणि कधीही फेडू शकत नाही आपल्या हक्काचे व्यासपीठ म्हणजे एकमेव आहे आईची थोरवी अपार आहे आईचे वात्सल्य कोणातही नसते म्हणूनच आई विरहाने व्याकुळ झालेले माधव जुलियन म्हणतात

     " प्रेमस्वरूप आई वात्सल्यसिंधू आई

      बोलावू तुझ आता मी कोणत्या उपायी "

                          मुकं जनावर देखील आपल्या अपत्यांवर अत्यंत प्रेम करते चिमणी घरटे विणतात आणि पिल्लांच्या चोचीत चारा आणून देतात. आकाशात घार फिरते पण तिचे सारे लक्ष आपल्या बाळापाशीच असते. ज्या सर्पिणीला आपण क्रूर समजतो तीदेखील आपल्या पिलांना जवळ माणसांचा नुसता आवाज ऐकू आला तरी आपल्या पिल्लांना घेऊन पोटात ठेवते माणसांचा आवाज येईनासा झाल्यावरच पिल्लांना पोटातून जिवंत बाहेर काढते गोठ्यातील वासरांना चाटणाऱ्या गाई ,घायाळ असतानाही पिलांसाठी चारा आणणारी पक्षिणी आणि मुलाने आईचा जीव घेतल्यावर तिचे काळीज घेऊन जाणार्‍या मुलाला ठेच लागताच बाळा तुला फार लागलं नाही ना? असे काळजातून टिपे काढणारी साने गुरुजींची माधवी आई ही सारी सारी आईची जात वात्सल्यमूर्ती विलक्षण आहे आपण या उदाहरणातून समजू शकतो की मानव असो किंवा प्राणी असो हा आईविना नेहमीच अपूर्ण असतो

                                   आपले लहानपण आठवा बरं आपण आईचे बोट धरून रस्त्यावरून चाललो असताना ते दिवस पावसाळ्याचे होते आकाश ढगांनी भरून आले होते पाऊस पडण्याआधी घरी पोहोचायचे होते पण क्षणात पाऊस सुरु झाला वीज कडाडली विजेच्या आवाजाने आपल्या पोटात भीतीचा गोळा उठला आणि आईने लगेच आपल्याला तिच्या पदरात झाकून घेतले म्हणूनच त्याची आई या जगात नाही अशी मुले विरहाने रात्रंदिवस तळमळत असतात आईचे महत्व जाणायचे असेल तर आश्रमात राहणाऱ्या मुलांना विचारा ते नेहमी आईच्या वात्सल्या साठी तळमळत असतात अशा मुलांना धन विद्या प्रतिष्ठा हे सारे लाभूनही ते उदास व अस्वस्थ राहतात

                       आई नुसते पालन-पोषण करते असं नाही तर ती जीवनाचे धडेही देते. मुलांच्या ओल्या मातीतून एक मूर्ती साकार करते राजमाता जिजाबाईंनी शिवबाला नाही का घडवले म्हणून जननी आणि जन्मभूमीच्या स्वर्गा पेक्षा ही श्रेष्ठ मानल्या आहेत आईच्या ठिकाणी नंदिनीचे सामर्थ्य आहे आई म्हणजे मांगल्याचे माहेर आहे आई म्हणजे अद्वैत तत्त्वज्ञान आहे सागराचे गांभीर्य पृथ्वीचे औदार्य चंद्रिके तेज आणि मेघा चे वात्सल्य आईत साठवले आहे सर्व नद्यांमध्ये गंगा जशी पवित्र तसेच सर्व प्रेमामध्ये मातेचे प्रेम हे महन मंगल असते किंबहुना मातृप्रेम हीच सर्व प्रेमाची गंगोत्री होय हे प्रेम ज्याला मिळत नाही त्याला इतर सारे मिळूनही काहीच मिळत नाही म्हणून तर माधव जुलियन म्हणतात                       

    " विद्या धन प्रतिष्ठा लाभो मला अता ही 

     आई विने परी मी हा पोरकाच राही "

                             आई  सगळ्यांची जागा घेऊ शकते पण आईची जागा कोणीच घेऊ शकत नाही. मुलींच्या आयुष्यात तर एकच आई असते नंतर कोणीच आईसारखी माया करणारी नाही मिळत त्यांना मुली मात्र मोठ्या होऊन स्वतः आई होतात. मुलीं पेक्षा पुरूषांच्या जीवनात अनेक रूपात आई येते , बहीण पण आई होते , बायको तर आई असतेच. काही काळानंतर मुलीही बाबांची आई बनतात . पण मुलींजवळ फक्त एकच आई असते त्यांचे नखरे ,हट्ट पुरवणारे त्यांना परत कधीच मिळत नाही मात्र मुलांच्या आयुष्यात तर आई शेवटपर्यंत  असते  ते पण वेगवेगळ्या  रूपात त्यांना त्यांच्या बहिणी आईसमान असतात तर बायको सुद्धा आईचे कर्तव्य निभवते आणि कधी कधी तर स्वतःची मुलगी सुद्धा आईसारखी असते पण मुलीना त्यांची आई पुन्हा कधीच मिळत नाही त्यांना एकदा का आई च घर सोडून नवऱ्याच्या घरी गेल की त्यांना आईसारखं समजून घेणारं कोणीच नसतं म्हणून आइची थोरवी खूप म्हणजे खूपच महान आहे आई तुझ्यासारखी तूच ग तुझी जागा कोणीच घेऊ शकत नाही असं म्हणायला काहीच हरकत नाही.  मातृदेवो भव: 

निष्कर्ष - जगात असा कोणताच व्यक्ती नाही आईचे ऋण पडू शकतो आईचे ऋण पैशाने कधीच बोलता येऊ शकत नाही आई जेवढे आपल्यावर प्रेम करते तेवढे प्रेम जगात कोणीच करू शकत नाही म्हणून माझी आई साऱ्या जगता हूं श्रेष्ठ आहे मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल तर नक्कीच लाईक कमेंट आणि शेअर करा पोस्ट वाचल्या बद्दल खूप खूप आभार!!

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कब्बड्डी या खेळाची माहिती | Kabaddi Information in Marathi

 आजच्या संगणक आणि मोबाईलच्या युगात मुलांचे मैदानी खेळ खेळण्याचे प्रमाण कमी झाले आहे त्यामुळे मुलांच्या आरोग्यावर याचा खूप परिणाम होत आहे 'सुदृढ आरोग्य हीच आपली खरी संपत्ती आहे 'आणि याचे महत्त्व दिवसेंदिवस अधिक ठळकपणे समोर येत आहे आपण लहानपणापासून "आरोग्य धनसंपदा"  हा श्लोक म्हणत आहोत आणि आपलं आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी व्यायाम मध्ये सातत्य ठेवावे लागते आणि ते ठेवणे आज-काल अवघड झाले आहे म्हणूनच यावर उत्तम उपाय म्हणजे खेळ .या जगात खेळ न आवडणारा माणूस विरळाअसेल.खेळ हे दोन प्रकारचे असतात, बैठे आणि मैदानी पण खेळ कोणताही असो त्याने मन आणि शरीर तंदुरुस्त राहते आपले कौशल्य विकसित होते त्यामुळे आज आपण कबड्डी या लोकप्रिय व राज्यस्तरीय स्तरावर खेळल्या जाणाऱ्या खेळाबद्दल माहिती जाणून घेऊया कबड्डीचा(हुतुतू) उगम- हुतुतू या   महाराष्ट्रीयन  शब्दापासून कबड्डी हा शब्द तयार झाला आहे कबड्डी हा सांघिक मैदानी खेळ आहे अनेक तज्ञ व जाणकारांचा मते महाभारतातील अभिमन्यू या थोर योध्याने या खेळाची सुरुवात केली होती असे मानले जाते तर या खेळाची सुमारे चार हजार वर्षांपासून ख्याती आहे प्रत्येक राज्याच्

संत तुकाराम महाराजांचे चरित्र | Sant Tukaram Information in Marathi

 तुकाराम महाराज हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील एक संत होते आज आपण संत तुकाराम यांच्या बद्दल माहिती जाणून घेणार आहोत चला तर जाणून घेऊयात संत तुकाराम यांची जीवनप्रवास जाणून घेउयात  तुकाराम महाराजांचा जन्म        महाराष्ट्रातील देहू या पावन क्षेत्री एका मोरे घराण्यात इसवी सन १६०८ रोजी वसंत माघ शुद्ध पंचमीला संत तुकाराम महाराजांचा जन्म झाला. तुकाराम महाराजांचे संपूर्ण नाव तुकाराम बोल्होबा आंबिले असे होते. वडिलांचे नाव बोल्होबा आंबिले व आईचे नाव कनकाई आंबिले असे होते. तुकारामांच्या वडीलांची शेतीभाती होती त्यांचे किराणा मालाचे दुकान सुद्धा होते. बोल्होबा म्हणजेच तुकारामांचे वडील अडल्या-नडल्यांना कर्ज देत असत.  बोल्होबा आंबिले यांना तीन अपत्ये होती पहिला सावजी मधले तुकाराम व कान्होबा पण तुकारामांचा मोठा भाऊ स्वभावाने विरक्त होता व कान्होबा सर्वात लहान असल्याने घराची संपूर्ण जबाबदारी तुकोबांवर होती. तुकोबांचे लग्न चौदाव्या-पंधराव्या वर्षी पुण्याचे आप्पाजी गुळवे यांची कन्या आवली (आवडी ) हिच्याशी प्रथम विवाह झाला, त्यानंतर त्यांच्यावर अचानक दुःखाचे डोंगर कोसळू लागले त्यांना अनेक प्राप

महात्मा गांधी- जीवन परिचय मराठी मध्ये ~ Mahatma Gandhi Information In Marathi

 आज आपण स्वातंत्र्य स्वतंत्र भारतात मुक्तपणे श्वास घेत आहोत, कारण की ते हुतात्म्यांनी व स्वातंत्र्यलढा यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी संपूर्ण जीवन समर्पित केले. त्या स्वातंत्र्यलढा पैकी एक आहेत आपले राष्ट्रपिता महात्मा गांधी, भारतमातेचे थोर सुपुत्र जगाला अहिंसेचे महान संदेश देणारे गांधीजी हे वंदनीय युगपुरुष होते. ते आपल्या कर्तृत्वामुळे महात्मा व राष्ट्रपिता अशा पदापर्यंत पोहोचले महात्मा गांधींचा जन्म          महात्मा गांधी या थोर राष्ट्रपिता जन्म 2 ऑक्टोबर १८६९ साली काठीयावाड पोरबंदर गुजरात येथे पुतळीबाई यांच्या पोटी झाला. गांधीजींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते, त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद गांधी व आईचे नाव पुतळीबाई गांधी असे होते, गांधीजी हे करमचंद यांच्या चौथ्या पत्नीचे म्हणजेच पुतळीबाईचे सुपुत्र आहेत आधीच्या तीन पत्नी या गर्भवती असतानाच मरण पावल्या .गांधीजींच्या आजोबाचे नाव उत्तम चंद उर्फ उत्ता गांधी असे होते, करमचंद गांधी हे गुजरातमधील पोरबंदर मध्ये दिवाण होते. धार्मिक वातावरणातील बालपणाचा मोठा प्रभाव गांधीजींच्या मनावर झालेला होता. विशेषता अहिंसा सहिष्णुता शाकाह