माझी आजी मराठी निबंध | Mazi Aaji Essay In Marathi

 


नमस्कार मित्रानो आज आपण आपल्या लाडक्या आजी बद्दल निबंध लिहणार आहोत | आपली आजी हि आपली सुपरमॉडेल आहे त्यामुळे तिच्याबद्दल लिहण्यात काही हि कंजुषी पणा करू नका धन्यवाद ! आणि पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा

 माझी आजी मराठी निबंध

आजीची माया ही बासुंदी पेक्षाही गोड असते. आजी ज्ञानाचे भांडार असते, अंधारात प्रकाशाचे दार असते , कधी मायेची हळुवारफुकर कधी छडीचा कडवा वार असते . आजी आमचे होकायंत्र आहे तीचे शब्द आम्हाला मंत्र आहे विचारात नेहमी गुरफटतो आम्ही ती मात्र अजुनही स्वतंत्र आहे . आजी म्हणजे दरारा असतो आजी म्हणजे शहारा असतो कुठलही पाऊल चुकत नाही नजरेचा खडा पहारा असतो . आजी म्हणजे दडपण आहे आजी म्हणजे प्रेम पण आहे पाहताक्षणी डोळ्यात भरणारे घराचे भारदस्त घरपण आहे . स्वराज्य घडविले शिवबाने पण लढविलेबाजीने आहे जन्म आई - वडिलांनी दिला संस्कार दिले आजीने आहे घरटे साजिरे बनविले तिने जे ते आम्ही वाढवणार आहे नसानसात वावरणारा हा तिचाच आत्मविश्वास आहे.

           माझी आजी जवळपास साडे पाच फूट उंचीची ,रंगाने गोरी असूनही उन्हापावसाने रापलेला  त्वचेची ,नवऱ्यामागे सगळा संसार गळ्यात पडूनही तिसऱ्या म्हणजेच आमच्या पिढीवर हुकूमत गाजवणाऱ्या आजीच्या हातात सत्तरी ओलांडून गेली तरी काठी आली नाही . माझ्या आजीचे दात तर शाबुत तर होतेच शिवाय मोत्यांसारखे चमकदार आहेत डोक्यात एकही काळा केस नाही ,विशाल कान धारदार नाक ,चेहऱ्यावर सुरकुत्या पडूनही तरुनपणाच्या सौंदर्याची जाणीव करून देणारी चेहऱ्याची ठेवण होती आजीचा कणा नेहमी ताठ ,पायात जुन्या वळणाच्या नाल्याच्या वहाणा ,अंगात चोळी आणि हिरवं व लाल रंगाचे लुगडी घालायची कपाळावरचं गोंदण दिसू नये म्हणून त्यावर ती बुक्का लावीत असे आजीच्या छत्रछायेखाली आमचे कुटुंब गुण्यागोविंदाने राहत होते

         आई नंतर आपल्या लाडाची व जवळची व्यक्ती म्हणजे आपली आजी आई बाबा रागवल्यानंतर ही आपल्याला लाड करणारी व्यक्ती म्हणजे आजी माझी आजी म्हणजे माझी एकप्रकारे  मैत्रीणच आणि ती गोष्ट आम्ही  अनुभवतो   माझं सगळं गुपित ज्या व्यक्ती जवळ उघड होतो ती एकमेव व्यक्ती म्हणजे माझी आजी आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात एक आजी असण हि खूप मोठ भाग्य आहे आजी म्हणजे आपल्या जवळ असलेला एक दुर्मिळ मौल्यवान हिरा होय आपली हक्काची व्यक्ती म्हणजे आपली आजी असते

         माझी आजी वेळेला खूप महत्त्व देते घरात सकाळी सर्वात लवकर उठणारी व्यक्ती म्हणजे आजी घरातला कोंबडा आरवला की उठलीच आजी !! तिच्यात आळस हा नावाचा शत्रू नाही उद्याचं कामही आजच करण्याचा प्रयत्न करते नेहमी जो वेळेसोबत चालत नाही त्याला वेळ संपवून टाकते म्हणून आजी दिवसभर सतत काहीना काही करत असते आजी म्हणते आराम हराम है म्हणून जोपर्यंत माणूस जिवंत आहेस तोपर्यंत त्याने काम करत राहिले पाहिजे असं तिचं म्हणणं आहे ती अजिबात वेळ वाया घालवत नाही  आजीच्या काळात शिक्षणाला जास्त महत्व नव्हते म्हणून माझी आजी फार कोबी शिकलेली नाही पण ती शिकलेल्या माणसांपेक्षाही जास्त अनुभवी व हुशार आहे माझी आजी नेहमी सतर्क असते संपूर्ण घराची जबाबदारी आजीवर असते व ती आनंदाने पूर्णपणे पार पाडते सकाळी ताटकपणे चार वाजता उठणारी आजी पारायण करते,देवपूजा करते आणि चहा नाश्ता करून वेळ न घालवता शेतात जाते व आमच्या सगळ्यांसाठीशेतातून गाजर मुळा टोमॅटो हिरव्या भाज्या घेऊन येते वरून घरात कपिली नावाची गाय आहे आजीचं तिचे दूध काढते व आम्हां सगळयांना ग्लासभर धारोष्ण दूध प्यायला देते 

         उन्हाळ्याच्या सुट्टीत आजीसोबत केलेली  मज्जा वेगळाच आनंद देऊन जातो अंगणात झोपणे,आजीसोबत गप्पा मारणे रोज रात्री झोपताना आजी गोष्ट सांगणार आणि आम्ही ते खूप उत्स्फूर्तपणे ऐकायचो,आणि रोज आजीच्या हातच नवनविन पदार्थ खायला मिळायचं वाह!तोंडाला पाणीच सुटलं तिच्या हाताला स्वादिष्ट चव असे त्यामुळे आजीने बनवलेले पदार्थ आम्ही आवडीने खायचो आजी आम्हाला तिच्या जुन्या काळातील गोष्टी सांगायची तेव्हा एवढ्या काही सुखसुविधा नव्हत्या पण आता सगळं काही उपलब्ध आहे पूर्वी बस ,वीज वॉशिंग मशीन,गॅस इत्यादी गोष्टी नव्हत्या त्यांचे जीवन या सगळ्या गोष्टी नसतांनाही कसे चालायचे याबद्दल ती मोठ्या कुतूहलाने सांगायची आणि आम्ही ते तेवढ्याच उत्सुकतेने ऐकायचो आजीच्या आणि आमच्या गप्पा खूप रंगायच्या माझी आजी जुन्या काळातळी होती असे तर मला अजिबात नाही वाटत करण आधुनिक जगातल्या गोष्टी ,विचार तिला पटायचे तिचे विचार आधुनिक होते आणि हेच कारण होते जे आमच्या आणि आजीमध्ये असलेले दृढ नात कारण आम्ही एकमेकांना इतकं समजून घ्यायचो की अस वाटायचं समोरची व्यक्ती ही वयस्कर नसून आपल्याच वयाची आहे असं वाटायचे.

         घरातल्या सगळ्या गोष्टींची आजी काटकसरीने यादी ठेवायची. घरात कोणाला लवकर उठायचं असेल तर आजीला सांगून झोपायचं. मग आजी बरोबर आम्हाला सकाळी लवकर उठायचे. आजोबा नंतर गावातील सगळी मंडळी सल्ला घेण्यासाठी आजी जवळ येत असत, गावाची शहानिशा करण्याची संपूर्ण जबाबदारी आजीवर असे आणि आजी जबाबदारी आनंदाने पार पाडे त्यामुळे आजीचे गावात खूप मोठे नाव आहे व गावातील मंडळी आजीचा खूप आदर करतात. माझी आजी भलेही शिकलेली नसेल पण तिच्या जवळ भरपूर पुस्तकांचा संग्रह होता जो आम्हाला उन्हाळ्याच्या सुट्टीत वाचायला मिळत असे ती सर्व पुस्तके आजोबा वाचत असायचे म्हणून आजीने आजोबांची आठवण म्हणून ती सर्व पुस्तके खास आमच्यासाठी जपून ठेवली होती आजी ची माया किती अपार आजी एक प्रेमाचा सुखद व सुंदर झरा आहे जो कधीच संपू नये असे प्रत्येकाला वाटते पण ज्यांच्याकडे आजी नाही त्यांना ही आजीची माया,प्रेम,वात्सल्य बघायलाच मिळत नाही त्यांना आजी हा शब्द काय असतो हे शेवट पर्यंत कळत नाही 

         पण मी मात्र खूप भाग्यवान आहे बुवा! मी आजीच्या छत्रछायेखालीच लहानाचा मोठा झालो आदर्श जीवन कसे जगायचं याचे धडे मी आजीकडून घेतले तिने मला शिकवले की आयुष्य जगात असताना कोणत्या गोष्टींना महत्व द्यावं ,वेळेसोबत आपण चालत गेलो की यश आपले पायापाशी असेल,आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आनंदी राहायचं असलं तर दुसऱ्यांच्या आनंदात आपलं आनंद मानणे ह्या आयुष्य जगत असताना महत्वाच्या गोष्टी मी माझ्या प्रिय आजीकडून शिकलो 

हे पण वाचा :