कर्मयोगी संत गाडगे महाराज निबंध | Sant Gadge Baba Nibandh in Matathi | Essay On Sant Gadge Baba in Marathi

 आज आपण अज्ञान ,अस्वच्छता, अंधश्रद्धा यांनी बुरसटलेल्या समाजाचा विकास करण्याचे व्रत हाती घेऊन कीर्तनासारखी प्रभावी माध्यम वापरून समाज धोरणाचे कार्य करणारे म्हणजे कर्मयोगी संत गाडगे महाराज यांच्या बद्दल माहिती जाणून घेणार आहोत 

बालपण

    महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात अंजनगावसुर्जी तालुक्यात शेगाव नावाच्या गावात 13 फेब्रुवारी १८७६ रोजी एका परीट धोबी परिवारात संत गाडगे बाबांचा जन्म झाला. संत गाडगे बाबांचे खरे नाव डेबुजी जानोरकर असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव झिंगराजी जानोरकर व आईचे नाव सखुबाई जानोरकर असे होते. झिंगराजी शेतीचे काम करून उपजीविका करत होते, काही वर्षानंतर गाडगेबाबा लहान असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले, म्हणून त्यांचे बालपण मामाच्या गावी मूर्तिजापूर तालुक्यातील दापुरे या गावी गेले, गाडगेबाबांचे मामा मोठे कर्तबगार मनुष्य होते. डेबुजी यांचा नित्यक्रम फार सुंदर असे, सकाळी लवकर उठून ते गुरांचा गोठा साफ करीत असत नंतर ताजा किंवा शिळ्या भाकरीची न्याहारी करीत.

दुपारच्या जेवणासाठी कांदा भाकरी ची शिदोरी एका फडक्यात बांधून घेत व गुरांना स्वच्छ पाणी पाजण्यासाठी निघून जाते. गुरांना तृप्त करून ते राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी म्हणत. रात्रीच्यावेळी गाडगे महाराज भजन ऐकायला जात असत, लहानपणापासूनच भूतदया गाडगेबाबांच्या रक्ता मासात भिनली होती त्यांना नेहमी आंधळ्या-पांगळ्या लुळ्या कुष्ठरोग विषयी अंत खूप कळवळा वाटे, स्वतः अक्षर शून्य परीट घराण्यात जन्मलेले असल्यामुळे गरिबांसाठी बालवयातच समतावाद काढावा ही साधारण गोष्ट आहे. डेबूजी सोळा वर्षांच्या असताना त्यांचे लग्न झाले काही वर्षानंतर सावकाराने त्यांच्या मामाची शेत हडपऊन घेतली हा धक्का गाडगेबाबांच्या मामांना सहन झाला नाही व ते मरण पावले. सावकाराने गाडगेजींवर हल्ला करण्यासाठी ४-५ गुंडे पाठवले पण त्यांनी गुंडयांना पिटाळून लावले. 

आणखी वाचा : संत तुकाराम महाराजांचे चरित्र

राहणीमान

      गाडगे महाराजांचा वेष हा साधाच बावळा चिंध्या शिवून घातलेले कपडे वाढवलेल्या दाढीची खुरटे फुटलेल्या अर्ध्या फुटलेल्या मटक्या ची टोपी, हातात झाडू अशा अवतारात गाडगेबाबा गावभर फिरत. लोकांना स्वच्छतेचे महामंत्र देत गेले. गाडगेबाबा हे पहिले संत आहेत ज्यांनी महाराष्ट्राला स्वच्छतेचा मंत्र दिला व देवाला न मानता लोकांच्या मनातील अंधश्रद्धा रूढी परंपरा यांना दूर करण्याचा प्रयत्न केला. गाडगे महाराजांची चिंध्या ची गोधडी हे महावस्त्र होते, व तुटक्या पादत्राणांची चे विजोड नेहमी जोड बाई असे डोक्यावर अर्ध फुटलेले मडके व हातात ग्रामस्वच्छतेचे मंत्र देणारे झाडू नेहमी त्यांच्या कडे असे. यावरून लोकांनी त्यांचे नाव गाडगेबाबा असे ठेवले. गाडगेबाबा श्रीमंतांनी दिलेले अन्न भिकऱ्यांना वाटून देत व स्वतः गरिबांच्या जेवनातील भाकरी मिरची खाण्यास पसंत करत असे. गाडगेबाबा खूपच साधे व सरळ होते

जगाचा संसार सुखी करण्यासाठी निघाले डेबूजी 

           एका आज्ञात विभूतीच्या हाकेला ओ देऊन आपला सुखाचा संसार सोडून १ फेब्रुवारी १९०५ या दिवशी पहाटे ३ वाजता जगाचा संसार सुखी करण्यासाठी डेबूजी घराबाहेर पडले . डेबूजीने उंबरठा ओलांडला केवळ गोरगरीब लोकांच्या उध्दारासाठी ,एका उच्च ध्येयांच्या प्राप्तीसाठी आत्मोध्दारासाठी, त्यांनी सर्वस्वाचा त्याग केला . डेबूजीच्या त्यागामध्ये कर्तव्याची तळमळ होती . दीनदुबळयांच्या भल्यासाठी डेबूजीने काटेरी मार्गाचा अवलंब केला . देशभ्रमणात लोकांची दयनीय अवस्था पाहिली . खर्या देवाला समाज विसरला आहे. कर्जापायी त्याची स्थिती दयनीय झाली आहे . अज्ञानाच्या जगात तोंडावर उगवलेले केस व एक कानात बांगडी आणि कवडी लटकवलेली असे . एका हातात काठी तर एका हातात गाडगे. कोणी विचारले तर ते म्हणायचे मला नावच नाही तुम्हाला जे आवडेल त्या नावाने बोलवा असे ते सांगायचे  . गाडगेबाबांचा वैरागी अवतार पाहतांना अगदी विचित्र वाटे . त्यामुळे त्यांना कोणी वेडा समजत , कोणी भिकारी समजत . 

 ते सकाळी उठत व संपूर्ण गाव झाडून घेत दिवसभर गावाची साफ़सफाई करत व रात्रीच्या वेळी लोकांची मने निर्मळ व स्वच्छ करण्यासाठी कीर्तन करत व लोकांना शहाणपणाचे ज्ञान देत. त्यांना मंदिर व स्मशान सारखेच होते . भजनासाठी त्यांना मंदिर , मशीद , चर्च लागत नसे . गावाच्या कट्ट्यावर किंवा निवांत जागी त्यांचे कीर्तन रमत असे बाबा एक गावात कधीच नाही थांबले. ते सगळीकडे जायचे व आपल्या कीर्तनाने लोकांना जागृत करत पुढे कुठे जायायचे ते माहीत नसे .  आपला झाडूचा मंत्र त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला दिला. बाबा जेथे जेथे जात तेथे तेथे गावकर्यांचे मने जिंकून घेत. व त्यातूनच त्यांनी धर्मशाळा व सामुदायिक विहिरी बांधल्या विषमतेवर व जास्तीभेदावर आघात करण्याची बाबांची पध्दत फारच परीणामकारक असे पण कधीकधी विनोदीही असायची.

सर्वांच्या जन्माची वाट एक आहे .आणि जायची सुध्दा मग हि शिवाशिवी कशासाठी ? ' हा कलंक धुवून निघाला पाहीजे.  कीर्तन हेच त्यांचे प्रभावी अस्त्र होते लोकांनां अंधश्रध्येच्या जाळातून काढण्याचे . मुर्तिपुजेपेक्षा गरीबांच्या सेवेकडे त्यांचे अधिक लक्ष होते. सामाजिक सुधारणा करण्यासाठी ,लोकांच्या मनातील भेदभाव दूर  करण्यासाठी  सावकारशाहीचे मूळ उच्चटन होण्यासाठी व सगळीकडे शिक्षणासारख्या प्रभावी शास्त्राचा प्रसार व्हावा इत्यादी उदात्त कार्यासाठी त्यांनी सारी हयात खर्च केली. त्यांनी समाजासाठी व राष्ट्रासाठी जे कार्य केले त्याला कोठेच तोड नाही.

बाबांनी आपल्या किर्तनातून शोषण , काळाबाजार , व्यापारीवर्गाव्दारे होणारी शेतकऱ्याची लूट या गोष्टीवर भरपूर प्रकाश टाकला. म्हणूनच गाडगेबाबा हे एक समाजवादी संत आहेत हे नामाभिमान शोभुन दिसते . दीनदुबळयांची सेवा हे त्यांच्या जीवनाचे व्रत होते.  नेहमी दुसरुयांचा विचार करणे म्हणजे एखाद्या भेकेल्या माणसाला जेवण तहानलेल्या माणसाला पाणी पाजणेयातच बेरोजगार लोकांना काम देने जे बेघर आहेत त्यांना घरे अशिक्षिताला शिकवणे हाच खरा धर्म आहे असे ते समजत . यालाच ते ईश्वराची सेवा समजत होते .लोक गाडगेबाबांना गावातून पैसे गोळा करून देत असत पण गाडगेबाबा ते पैसे गावात धर्मशाळा ,गोशाळा ,गरिबांसाठी शिक्षणसाठी शाळा उभारण्यात खर्च करत.


संत गाडगेबाबांचं अभंग

जे जे आपणांस ठावे ते ते लोकांस द्यावे 

व सकळजनांस शहाणे करून सोडावे

   संत गाडगेबाबा आपल्या अभंगातुन लोकांना अंधश्रद्धा, रूढी परंपरा या गोष्टीचा काळोखातुन बाहेर काढण्याचा प्रयत्न करत. ते म्हणायचे आपल्या जवळ जे काही चांगलं ज्ञान आहे, ते लोकांना द्यावे व आपल्या आजूबाजूच्या सगळ्यांना शहाणे करावे. गाडगेबाबांनी लोकांची अंधश्रद्धा दूर करण्यासाठी अनेक उदाहरणे दिली .रात्रीच्या वेळी आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून ते लोकांना उपदेश करत असत. एकदा ते लोकांना म्हणाले देव मोठा की चोर मोठा तर लोक म्हणाले देवच मोठा. त्यावर गाडगेबाबा म्हणाले जो चोर देवालयातील देवाला चोरून नेतो आणि देव स्वतः लाही वाचवू शकत नाही.

मग देव मोठा की चोर मग मंडळी म्हणाली की चोर मोठा . गाडगेबाबांनी पुन्हा सगळ्यांना विचारले की देव मोठा की पाणी मोठा लोक पुन्हा म्हणले देव मोठा ,मग गाडगेबाबांनी परत उपदेश केला की मातीचा देव पाण्यात सहजपणे विरघळून जातो. मग पाणी जास्त शक्तिशाली की देव मग लोकांना कळलं की जो जास्त शक्तिशाली तोच मोठा म्हणजेच पाणी मोठं. त्यांनतर लोकनच अज्ञान दूर झालय की नई हे पाहण्यासाठी त्यांनी परत प्रश्न केला की देव मोठा की जाळ मोठा पण तेव्हा लोकांनी बरोबर उत्तर दिले की जाळ मोठा करण लाकडाच्या देवाला जाळ सहज जाळू शकते. अश्या प्रकारे गाडगेबाबांनी आपल्या कीर्तनातून लोकांच्या मनातील अंधश्रद्धे ला दूर करण्यासाठी खारीचा वाटा उचलला आहे.


संत गाडगे महाराज केलेली महत्वाची कामे

 • १९०८ : मध्ये पुर्णा नदीवर घाटाचे निर्माण केले . 
 • १९२५ : मुर्तीजापूर येथे गोरक्षण , धर्मशाळा व विद्यालयाचे निर्माण केले .
 • १९१७ : पंढरपूर येथे चोखामेळा धर्मशाळेचे निर्माण गाडगेमहाराजांनी केले .
 • फेब्रुवारी ८  इ.स . १९५२ रोजी श्री गाडगेबाबा मिशन ' स्थापन करून महाराष्ट्रभर शिक्षणसंथा व धर्मशाळा स्थापन केल्या .  
 • १९३२ : ऋणमोचन येथील सदावर्त संत गाडगेबाबांनी सुरू केले . त्यांनी लोकजागृती चा मार्ग अवलंबला गाडगेबाबांना "गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला"हे भजन आवडते होते
 • १९३१ : वरवंडे येथे गाडगेबाबांच्या प्रबोधनातून पशुहत्या बंद झाली . 
 • १९५४ : जे.जे. हॉस्पिटल धर्मशाळा ( मुंबई ) बांधली . गाडगेबाबा यांनी अनेकांना मदत केली 
 • डॉ आंबेडकर सुद्धा त्यांना गुरू स्थानी मानत असत .

हे पण वाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण  माहिती

गाडगेबाबांचे दशसूत्री संदेश

 • १) भुकेल्या ,उपाशीपोटी असलेल्यांना अन्न द्या.
 • २) तहानलेलल्यांची तहान तृप्त करावी.
 • ३) ज्यांच्याकडे वस्त्र नाही अश्या वस्त्रहीन व्यक्तीला वस्त्र द्या.
 • ४) गरीब मुलांच्या शिक्षणासाठी मदत करावी.
 • ५) बेघर असलेल्या लोकांना आसरा द्यावी.
 • ६) लुळ्या-पांगळ्या,अंध ,रोगी माणसांना मदत करा.
 • ७) बेरोजगारांना काम द्यावे.
 • ८) पशु पक्षि म्हणजे मुकप्राण्यांना अभय द्यावी.
 • ९) गरीब मुलांच्या लग्नात मदत करावी.
 • १०) दुःखी हताश माणसांना हिम्मत द्यावी हाच खरा धर्म आहे.


गाडगेबाबांचे निधन 

     गाडगेबाबा हे देवाला ना मानणारे संत झाले देव मनांत पडतो असे त्यांचे म्हणणे होते ते एकमेव संत आहेत जे देवापेक्षा आपल्या कर्तृत्ववांवर जास्त निष्ठा ठेवायचे. संत गाडगेबाबांचं मृत्यू अमरावती येथील पेढे नदीच्या पुलावर लोकसेवेच्या धकाधकीच्या कार्यतच २०डिसेंबर १९५६ साली मृत्यु झाला व गाडगेबाबांच्या स्मरणार्थ अमरावती मधील विद्यापीठाला संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती असर ठेवण्यात आले

गाडगेबाबांवर आधारित पुस्तके:- गाडगेबाबांच्या जीवनावर आधारलेल एकमेव पुस्तक म्हणजे,

१) देवकीनंदन गोपाला  ( गोपाळ निळकंठ) 

२) लोकसेवक कर्मयोगी.

३) संत गाडगेबाबा(गिरीजा कीर)

४) लोकशिक्षक गाडगेबाबा(रामचंद्र देखणे)

५) गाडगेमहात्म्य (काव्यात्मक चरित्र -नारायण वासुदेव गोखले)

चित्रपट -

१) निलेश जलमकर यांनी आपल्या चित्रपट सृष्टीत निर्माता बनण्याची सुरुवात डेबू (२०१०) या चित्रपटापासून केली व हे चित्रपट संत गाडगेबाबावर आधारित होते या चित्रपटाला बरीच लोकमान्यता मिळाली .

२) देवकीनंदन गोपाळा (दिग्दर्शक राजदत्त)


  आणखी वाचा : 

1) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण  माहिती

2) संत तुकाराम महाराजांचे चरित्र