संत तुकाराम महाराजांचे चरित्र | Sant Tukaram Information in Marathi

 तुकाराम महाराज हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील एक संत होते आज आपण संत तुकाराम यांच्या बद्दल माहिती जाणून घेणार आहोत चला तर जाणून घेऊयात संत तुकाराम यांची जीवनप्रवास जाणून घेउयात 

तुकाराम महाराजांचा जन्म

       महाराष्ट्रातील देहू या पावन क्षेत्री एका मोरे घराण्यात इसवी सन १६०८ रोजी वसंत माघ शुद्ध पंचमीला संत तुकाराम महाराजांचा जन्म झाला. तुकाराम महाराजांचे संपूर्ण नाव तुकाराम बोल्होबा आंबिले असे होते. वडिलांचे नाव बोल्होबा आंबिले व आईचे नाव कनकाई आंबिले असे होते. तुकारामांच्या वडीलांची शेतीभाती होती त्यांचे किराणा मालाचे दुकान सुद्धा होते. बोल्होबा म्हणजेच तुकारामांचे वडील अडल्या-नडल्यांना कर्ज देत असत.

बोल्होबा आंबिले यांना तीन अपत्ये होती पहिला सावजी मधले तुकाराम व कान्होबा पण तुकारामांचा मोठा भाऊ स्वभावाने विरक्त होता व कान्होबा सर्वात लहान असल्याने घराची संपूर्ण जबाबदारी तुकोबांवर होती. तुकोबांचे लग्न चौदाव्या-पंधराव्या वर्षी पुण्याचे आप्पाजी गुळवे यांची कन्या आवली (आवडी ) हिच्याशी प्रथम विवाह झाला, त्यानंतर त्यांच्यावर अचानक दुःखाचे डोंगर कोसळू लागले त्यांना अनेक प्रापंचिक जीवनाचे तडाखे खावे लागले ते सतरा-अठरा वर्षांचे असताना त्यांचे डोक्यावरून आई वडिलांचे छत्र हरवले. 

मोठा भाऊ विरक्त स्वभावामुळे तीर्थयात्रेला निघून गेला आणि कान्होबा लहान असल्यामुळे घराची संपूर्ण जबाबदारी तुकारामांवर आली. तुकारामांना चार मुले होती कन्या भागीरथी व काशी तर मुलगे नारायण व महादेव तुकारामांचा संतू नावाचा मोठा मुलगा पुरात वाहून गेला त्याची गुरेढोरे सर्व काही वाहून गेले त्यांची पहीली बायकोसुद्धा वारली. सुस्थित असलेले तुकाराम कर्जबाजारी होण्याची परिस्थिती आली पण तुकोबा खचले नाहीत त्यांनी या प्रापंचिक गोष्टीवर एकच उपाय दिसला तो म्हणजे भक्तिमार्ग त्यांचे मन हळूहळू धार्मिक गोष्टीत रमु लागले.

तुकारामांचे कुटुंब हे वारकरी संप्रदायातील होते त्यांचा कुलपुरुष विश्वंभर हे सुद्धा भजन-कीर्तनात रमलेले होते, पंढरपूरचा विठ्ठल हा तुकोबांचे आराध्य दैवत होते त्यांनी डोंगरावर जाऊन ध्यान धारणा करण्यास सुरुवात केली, तुकाराम दर कार्तिकी ला पंढरपूरला जात तिथे अभंग भजन किर्तन करत हजारो लोकांची गर्दी त्यांच्या किर्तनाला असेल, या कीर्तन श्रोत्यांमध्ये शिवाजी महाराज सुद्धा असायचे शिवाजी महाराज संत तुकारामांचे मोठे भक्त होते. बहिणाबाई तुकारामांची शिष्या होती संत तुकाराम  लोकांना दया क्षमा शांती यांची शिकवण देत होते. तुकारामांनी अनेक साहित्य लिहिले ते महाराष्ट्राचे अभंगकार आहेत .साहित्याचा खूप मोठा ठेवा त्यांनी महाराष्ट्रभूमीला दिला त्यांनी भागवतगीतेवरून स्वतःची गितगाथा लिहिली. 

   जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले         

    तोचि साधू ओळखावा देव तेथेची जाणावा 

तुकारामांनी आपल्या भजन किर्तन व ओव्यांमधून समाजातील अंधश्रद्धेला दूर करण्याचा प्रयत्न केला पण समाजातील लोक त्यांना वेडे म्हणतात तरीही तुकाराम महाराजांनी आपला धर्मप्रचार सोडला नाही, ते गावोगावी जाऊन भजन कीर्तन करू लागले त्यांनी सुमारे पाच हजार अभंग असलेली गीत गाथा लिहिली. आणि त्याद्वारे समाजाला उपदेश करत होते त्यांनी संस्कृत भाषेतील वेद पुराण आपल्या भाषेत अनुवाद केल्यामुळे रामेश्वर भट यांनी तुकारामांनी लिहिलेली गाथा इंद्रायणी नदीत बुडवण्याची शिक्षा दिली. पण त्याचवेळी हजारो लोकांच्या तोंडून गाथेतील अभंग बाहेर पडत होते, 

तेव्हा त्यांना जाणवले की आपली गाथा बुडाली नाही तर ती जनसामान्यांच्या मुखात अखंड आहे. सतराव्या शतकातील संत तुकाराम महाराज बहुजन समाजाला देव धर्माबद्दल जागृत करण्यास यशस्वी ठरले. समाजातील अंधश्रद्धा रूढी परंपरा इत्यादींचा पगडा दूर करून समाजाला नवी दृष्टी देण्याचे कार्य केले ,संत तुकारामांचे जीवन सूत्र हे परस्पर सहकार्य होते त्यांनी आपल्या वाटणीची कर्ज खाते इंद्रायणी नदी मध्ये बुडवली व अनेकांना कर्जमुक्त केले लोक संत तुकाराम महाराजांचा जयजयकार करू लागले. आजही महाराष्ट्रभर ज्ञानबा तुकाराम हा जय घोष ऐकू येतो तुकाराम गाथा ही ही आजही घरोघरी वाचले जात

संत तुकारामांचे अभंग

1)   लहानपण देगा देवा 
  मुंगी साखरेचा रवा

      संत तुकाराम वरील अभंगांमध्ये असे म्हणतात की आपण जगात कितीही श्रीमंत दौलतमंद झालो तरी दुसऱ्यांच्या प्रति विनम्रता आदर ठेवली पाहिजे गर्वाने फुगून कधीच हा विचार करू नये की समोरचा आपल्यापेक्षा छोटा आहे प्रत्येकाने सर्वांशी माणुसकीने वागले पाहिजे म्हणून संत तुकाराम देवाजवळ मागणे घालतात की अहंकाराचा मोठेपणा आमच्या मनात उत्पन्न नको होऊ देऊ आम्हाला मनाने एवढे लहान बनव की मुंगी साठी ही तो साखरेचा रवा असेल अशा प्रकारे संत तुकाराम अहंकारा सारख्या विकाराला आपल्यापासून दूर ठेवण्याचा उपदेश करतात

 2) जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोचि साधु ओळखावा देव तेथेची जाणावा

       संत तुकाराम म्हणतात आयुष्यामध्ये खूप कष्ट करतात ज्यांच्या आयुष्यात सतत संकट येतात आणि तरीसुद्धा ते परिस्थितीला मागे न हटता आयुष्याशी तक्रार न करता संकटांना मत देतात तेच देवाचे खरे भक्त आहेत संत कधीच  देवाजवळ तक्रार करत नाहीत आणि अशी लोक देवाच्या रुपात असलेले संत आहेत


3)            चित्ता मिळे त्याचा संग रुचिकर 

             क्षोभविता दूर तो चि भले ।।१।।

            ऐसी परंपरा आलीसे चालत

            भलत्याची नित त्यागावरी।।२।।

          होका पिता पुत्र बंधु कोणी तरि।

             विजाती संग्रही धरू नये।।३।।

          तुका म्हणे सत्य पाळावे वचन 

             अन्यथा आपण करू नये।।४।।

     संत तुकारामांचे म्हणणे आहे की ज्याचा म्हण आपल्या मनाशी जुळतं त्याची संगत आपल्याला आवडत असते आणि जर आपलं मन समोरच्याच्या मनाशी जुळत नसेल तर आपण त्या व्यक्ती पासून लांब राहिलेलंच बरं कारण आपण जर अशा व्यक्ती सोबत राहिलो तर आपल्याला अस्वस्थ वाटेल त्या व्यक्तीसोबत आपले संबंध चांगले राहणार नाही आणि हीच परंपरा चालत आली आहे ज्याची नीत चांगली नसेल त्याचा नेहमी त्याग करावा मग तो वडील असो पुत्र असो भाऊ असो किंवा आणखी कोणीही असो ज्या व तिचे मूल्य आपल्या सद भावांशी जुळत नसेल तर त्या व्यक्तीस संगती करू नये तुकाराम म्हणतात नेहमी सत्याची व माणुसकीची बाजू धारावी म्हणजे ज्याला सदाचार यांच्या वाघ्या पासून त्रास होत असेल अशा लोकांपासून दूर राहावं

तुकारामांचे वैकुंठ गमन

      फाल्गुन वद्य द्वितीयेला तुकाराम अनंतात विलीन झाले आणि सदेह वैकुंठाला गेले असे फार प्राचीन काळापासून मानले जाते त्यांचा हा निर्वाण दिवस तुकाराम बीज म्हणून ओळखला जातो पण ते सदेह वैकुंठाला गेले की त्यांची हत्या झाली होती याची पूर्ण सत्यता अजूनही उलगडलेली नाही याबाबतीत तुकारामांच्या गाथेचा जीवन चरित्रांचा अभ्यास करणाऱ्या अनेक लेखक कवींनी सांगितले आहे