आई संपावर गेली तर निबंध | Aai Sampavar Geli Tar Essay

एखादी गोष्ट जेव्हा आपल्या आयुष्यात नसते तेव्हाच आपल्याला त्या गोष्टीची खरी किंमत कळते आणि आपली आई जी आपली  सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत सगळ्या गोष्टींची काळजी घेते तीच जर संपावर गेली तर .... सर्व माता संपावर गेल्या तर विचार करताच झोप उडती .माझी आई माझ्यासाठी उत्कृष्ट महिला आहे.  तिचा हसरा चेहरा आजूबाजूच्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हास्य आणतो, ती देवाच्या प्रेमाची आणि दयाची प्रतिमा आहे ... आपण तिला संपावर जाऊ कसे द्यावे?  "पूर्व किंवा पश्चिम, घर सर्वोत्कृष्ट आहे" ही म्हण सत्य आहे.  आमच्या निस्वार्थ आईमुळे आमचे घर नंदनवनापेक्षा कमी नाही.  ती तिच्याशिवाय पूर्ण गोंधळात पडेल.  माता आपल्या कुटुंबातील सदस्यांवर अत्यंत प्रभाव पाडतात.  ती आम्हाला मार्गदर्शन, मार्गदर्शन, नेतृत्व आणि प्रेरणा देते.  आपण आपल्या आईकडून   तत्त्वे  आणि मूल्य निवडतो, तिच्याशिवाय आपण कशासाठीही चांगले किंवा आयुष्यात श्रेष्ठ होऊ शकत नाही.  शिवाजीच्या बालपणावरील जिजा मातेच्या प्रभावाविषयी आणि त्यांच्या भविष्यातील तेजस्वीपणाबद्दल आपण सर्वजण परिचित आहोत

माणसाचे मन हे निरनिराळे, विचित्र असते .बहुतेक वेळा आपल्याला अशक्य वाटणाऱ्या कल्पनांचे आगर  मनाला भुरळ पडणारे असते वास्तवात कल्पना कधी येतील आणि मनावर त्याचा किती खोल पर त्यामुळे सांगू ही शकत नाही आणि अशीच आज एक कल्पना माझ्या डोक्यात आली आई संपावर गेली तर.....

संसार रुपी रथाची नवरा-बायको ही दोन चाके असतात आईच काही वर्षांनी संसार रुपी रथाची खरी सारथी होते या रथाची चालिका तीच असते आणि विचार करा रथाचा चालक म्हणजे आई संपावर गेली तर कुटुंबाची गाडी भरकटत जाईल घरातच नव्हे तर सगळीकडे हाहाकार उडेल घरातील सगळ्यांची जातीने जबाबदारीने काळजी करणारी हक्काची व्यक्ती कोणीच नसेल सकाळी वेळेवर झोपेतून उठल्यापासून ते रात्री निजेपर्यंत सर्वच गोष्टींचा गोंधळ  उडेल .घरातील इतर मंडळींची त्रेधातिरपीट होईल आपली शाळेची तयारी ,डब्बा कोण देणार, नाश्ता कोण बनवणार, तसेच शाळेतील स्पर्धा, इत्यादी .गोष्टींची धांदल उडेल आजी आजोबांची काळजी कोण करणार तसेच त्यांना जेवण व औषधे कोण देणार याशिवाय घरातील पसारा अवस्था सांभाळणे कठीण होईल

बाजारात जाऊन भाजीपाला आनने ,बँकेत जाणे, सगळ्यांचे बिल भरणे ,इत्यादी कामे ठप्प होतील संपूर्ण घर विस्कळीत होऊन जाईल .आईमुळे घराला असलेले घरपण नाहीसे होईल .

       आई संपावर गेली तर तिला आयुष्यभरात न मिळालेली विश्रांती मिळेल तिला स्वतःसाठी वेळ मिळेल आरोग्याची काळजी घेता येईल तिच्या आयुष्यातील आवड जोपासता येईल पण तरीही तिच्या मनात हुरहूर असेलच की आपण संपावर गेलो म्हणून....!!

       पण एक गोष्ट मात्र चांगली होईल की कुटुंबातील व्यक्तींना तिची योग्यता तसेच तिने केलेल्या श्रमाचे मूल्य मात्र कळेल तिचा आपण सर्वांनी सन्मान केला पाहिजे दर वेळेस चुकीचे न समजता तिथे मत विचारात घेतले पाहिजे एक स्त्री म्हणून तिचे स्वतंत्र अस्तित्व असायला पाहिजे आईलाही हा स्वप्नवत असलेला बदल हवाहवासा वाटेल म्हणून परत संपावर जाण्याची वेळ तिच्यावर कधी येणार नाही 

आई संपावर गेली तर......!! हा विचार करताच माणसाची झोप उडते पण तिने हे करणे अनिवार्य आहे कारण आपण जर तिला समजून नाही घेतलं तर कोण घेणार सकाळी उठल्यापासून ते रात्री निजेपर्यंत तीच सगळ्या गोष्टींची काळजी करते आणि तीच संपावर गेली तर ...!! काय होईल याची कल्पना करने सुद्धा भीतीदायक आहे ? म्हणून आम्ही हा निबंध तुमच्यासाठी घेऊन आलो अहोत आपल्याला हा निबंध आवडला तर नक्कीच शेयर करा!!