Cricket Information in Marathi–क्रिकेट बद्दल माहिती मराठीत

आजकालच्या आधुनिक युगात क्रिकेट हा सर्वांचा म्हणजेच लहान ,तरुण,व  वृद्ध लोकांचा अत्यंत आवडीचा खेळ म्हणजे क्रिकेट  होय क्रिकेट हा मुख्यता आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळला जाणारा खेळ म्हणून ओळखला जातो.क्रिकेट एक लोकप्रिय सांघिक खेळ आहे आपल्या आरोग्याला स्वस्थ आणि मस्त ठेवण्यासाठी आपल्याला काही ना काही खेळत असले पाहिजे आजकालच्या धकाधकीच्या जीवनात स्वस्थ आणि सुदृढ राहणे आणखीनच महत्वाचे झाले आहे चला तर मग पाहूया अश्याच एका खेळाबद्दल जो आपल्या व आपल्या आरोग्यासाठी खूप लाभदायक आहे आणि आपल्या सगळ्यांचा आवडत खेळ क्रिकेट!!

Cricket Information in Marathi–क्रिकेट बद्दल माहिती मराठीत


क्रिकेट म्हणजे काय?

 क्रिकेट  हा मैदानावर दोन संघासोबत खेळला जाणारा खेळ आहे प्रत्येक संघामध्ये प्रत्येकी ११ खेळाडूंचा समावेश असतो क्रिकेट खेळताना चेंडू(बॉल) आणि फळी म्हणजेच बॅट आणि यष्टी या गोष्टींची आवश्यकता असते क्रिकेटचे मैदान हे २२-यार्ड लांबीच्या मध्यभागी मुख्य खेळ पट्टी असते दोन्ही टोकांना तीन लाकडी यष्टि असतात एक संघ नेहमी फलंदाजी संघ म्हणून खेळत असतो हा संघ जास्तीत जास्त धावा करण्याच्या प्रयत्नात असतो आणि त्याचा प्रतिस्पर्धी संघ हा क्षेत्ररक्षण करत असतो डाव म्हणजे खेळाचा प्रत्येक टप्पा असतो एका संघाचे दहा फलंदाज बाद होतात किंवा निर्धार केलेली षटके झाल्यावर दोन्ही संघ आपापली भूमिका बदलतात एक किंवा दोन दावा मध्ये अतिरिक्त धावा मिळून जो संघ जास्तीत जास्त धावा मिळवतो तो संघ विजेता ठरतो

क्रिकेट बद्दल महत्वाची माहिती

 विल्यम गिल्बर्ट हा 'फादर ऑफ क्रिकेट' म्हणून ओळखला जातो आयसीसी ही क्रिकेट खेळाची सर्वोच्च संघटना आहे १८ व्या शतकापासून क्रिकेट खेळाचे मुख्यता: सुरुवात झाली क्रिकेटला 'द जेंटल मॅनस् गेम 'सुद्धा म्हटले जाते आयसीसी ही क्रिकेटची मुख्य संघटना दुबई मध्ये आहे या संघटनेचे ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका हे देश मुख्य सदस्य आहेत ही क्रिकेट समिती १५ जून १९९० रोजी लॉर्ड्स येथील इम्पेरियल क्रिकेट परिषद म्हणून स्थापन झाली आयसीसी या संघटनेचे १०४ देश सदस्य आहेत

क्रिकेटची व्युत्पत्ती-

अनेक शब्दस्रोत प्राचीन काळापासून क्रिकेट या संज्ञेबद्दल सुचवले जातात १५९८ मध्ये क्रिकेट खेळाचा सर्वात आधी संदर्भ मिळतो तेव्हा खेळाला crekkett असे म्हटले जात होते प्रसिद्ध लेखक सॅम्युअल जॉन्सनच्या शब्दकोशानुसार cryce, saxon, a stick वरून क्रिकेट हा शब्द तयार झाला होता युरोपियन भाषातज्ञ हेनर गिलमेइस्टर हे बॉन विद्यापीठातील होते त्यांच्यामते हॉकीसाठी वापरला जाणारा वाक्प्रचार metde        (krikket)sen म्हणजे काठी सह पाठलाग यावरून क्रिकेट(cricket )हा शब्द घेतला होता

क्रिकेटचा इतिहास

 इसवी सन सोळाव्या शतकापासून इंग्लंड मधील ट्यूडर काळापर्यंतचे क्रिकेटचे पुरावे सापडले आहेत म्हणजे सर्वात पहिल्यांदा क्रिकेट हा सोळाव्या शतकात इंग्लंडमध्ये खेळला गेला होता १५९८ मधील न्यायालयातील कारवाईतील पुराव्यांमध्ये सर्वात आधीचे क्रिकेट खेळल्या गेल्याचेही संदर्भ आहेत ज्यामध्ये गिल फोर्ड च्या काळात १५५० च्या सुमारास क्रिकेट खेळाची नोंद आठवते क्रिकेट हा विशेषता लहान मुलांचा खेळ आहे असा समज आहे पण १६११ मध्ये असा संदर्भ आहे की हा खेळ प्रौढांनी पहिल्यांदा खेळन्यास सुरुवात केली होती आणि सर्वात जुना ज्ञात इंटर- पॅरिश किंवा विलेज सामना खेळला गेला इंग्लिश वसाहतींद्वारे उत्तर अमेरिकेत १७ व्या शतकाच्या उत्तरार्धात क्रिकेट खेळाची ओळख झाली आणि त्यानंतर अठराव्या शतकात ते जगाच्या इतर भागात आले.

क्रिकेटचे नियम

१) क्रिकेट हा खेळ दोन संघांदरम्यान खेळला जातो

२) प्रत्येक संघात प्रत्येकी अकरा खेळाडूंचा समावेश असतो

३) एक संघ हा धावा करण्याच्या प्रयत्नात फलंदाजी करत असतो तर दुसरा संघ हा गोलंदाजी आणि धावा रोखण्यासोबत फलंदाज करणाऱ्याला बाद करण्याच्या प्रयत्नात चेंडू अडवतो.

४) क्रिकेट मध्ये सामना जिंकण्यासाठी प्रतिस्पर्धी संघातील सर्व खेळाडूंना बाद करणे अत्यंत महत्त्वाचे असते अन्यथा असा सामना अनिर्णित राहतो 

५)एक किंवा दोन डावात अतिरिक्त धावा मिळून जास्तीत जास्त धावा करणारा संघ हा विजेता ठरतो

क्रिकेटमधील महत्त्वपूर्ण गोष्टी

१) १९०९ साली क्रिकेटची सुरुवात झाली तेव्हा इंग्लंड दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया हेच सदस्य होते त्यानंतर आपला भारत देश देखील क्रिकेटचा सदस्य झाला आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पाकिस्तान व नंतर श्रीलंका देखील सदस्य झाले

२) १९७५ साली आयसीसी वनडे विश्व कप स्पर्धेची सुरुवात झाली

३) २००० साली आयसीसीने टेस्ट चॅम्पियनशिप आणि वन-डे आंतरराष्ट्रीय स्पर्धेची सुरुवात केली होती २००७ सालीपर्यंत ऑस्ट्रेलिया हा पहिल्या क्रमांकावर राहिला.

४) इंग्लंडचा राष्ट्रीय खेळ म्हणून क्रिकेट ओळखला जातो परंतु आतापर्यंत इंग्लंडने एकही विश्वकप पटकावला नाही २०१९ चा विश्वकप मात्र इंग्लंडने आपल्या नावावर केला आहे

५) ऑस्ट्रेलियाकडे सर्वात जास्त विश्वकप जिंकला चा रेकॉर्ड आहे ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत तब्बल पाच वेळा विश्वकप जिंकला

६) भारताकडे दोन वेळा विश्व कप जिंकलाचा  मान जातो

७) २००७ साली आयसीसीने क्रिकेटची टी-ट्वेंटी मालिका सुरू केली व ही टी-ट्वेंटी मालिका जिंकण्याचा सर्वात पहिला मान भारताकडे जातो

भारताचा क्रिकेट

सर्वात पहिल्यांदा ब्रिटिशांनी क्रिकेट हा खेळ भारतात आणला पण आज क्रिकेटचे चाहते सर्वात जास्त आपल्या भारत देशात आहेत २००८ साली इंडियन प्रीमियर लीग ची सुरुवात भारतात झाली १९८२ साली कपिल देवच्या नेतृत्वाखाली भारताने पहिला आयसीसी वन-डे विश्वकप जिंकला होता याशिवाय भारतीय क्रिकेट बोर्ड बीसीसीआय हा जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड समजले जाते भारत देशात एका क्रिकेटरचा पगार हा 50 लाख ते दोन करोड च्या दरम्यान आहे

क्रिकेट हा सर्वांचा आवडता व अत्यंत असा लोकप्रिय खेळ म्हणून  त्याची जगामध्ये ख्याती आहे  क्रिकेट एक लोकप्रिय सांघिक खेळ आहे आपल्या भारतातील अनेक क्रिकेटपटू जगावर राज्य करतात जसे कपिल देव ,सचिन तेंडुलकर, विराट कोहली,एम. एस धोनी,युवराज सिंग,रोहित शर्मा ,हार्दिक पंड्या आदी क्रिकेट वीर आपल्या भारतात आहेत जे अनेक भावी पिढ्यांचे रोल मॉडेल म्हणजेच आदर्श आहेत अश्या प्रकारे भारतात सुद्धा क्रिकेट हा अत्यंत आवडता खेळ म्हणून ओळखला जातो 

भारतातील क्रिकेट चाहत्यांसाठी आणि आपल्या जनरल नॉलेज साठी आम्ही हा आर्टिकल लिहला आहे . जर आर्टिकल पसंद पडला असेल तर नक्की शेयर आणि कंमेंट करा जेणेकरून आम्हाला आपल्या प्रतिक्रया समझतील धन्यवाद !