मुख्य सामग्रीवर वगळा

संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती [ Marathi ]

 "स्वर्गापेक्षा मी चांगल्या पुस्तकाचे स्वागत करिन कारण पुस्तक जिथे असेल तिथे स्वर्ग निर्माण होईल"

असे म्हणणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खरोखरच जगाचे महामानव ठरले जगाच्या शंभर विद्वानांपैकी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक आहेत

आंबेडकरांचे बालपण

बाबासाहेबांचे लहानपण हे खूप हलाखीचे गेले, त्यांच्या जातीला अस्पृश्यतेची जात असे म्हणले जाई म्हणून त्यांना समाज स्वीकारत नसे, त्यांना शिकण्यासाठी शाळेत सुद्धा प्रवेश नसे मंदिरातही त्यांना पूजेसाठी प्रवेश नसे, बाबासाहेबांनी वर्गाच्या बाहेर बसून शिक्षण घेतले पण त्यांनी शिकण्याची जिद्द शेवटपर्यंत सोडली नाही

ज्या विद्यार्थ्याला वर्गात बसू दिलं जात नव्हतं त्याच विद्यार्थ्यांचा शाळेतील प्रवेश दिवस हा विद्यार्थी दिवस म्हणून साजरा केला जातो आणि बाबासाहेबांचा कर्तुत्व इतका मोठा आहे की जगालाही अपुरा पडे

या महामानवाचा जन्म 14 एप्रिल 1891 या दिवशी भिमाबाई रामोजी सपकाळ या थोर आईच्या पोटी महू या गावी सातारा जिल्ह्यात झाला, त्यांचे वडील रामोजी सपकाळ सैन्यात सुभेदार म्हणून काम करायचे, बाबासाहेबांचे मूळ आडनाव आंबेडकर नव्हे तर अंबावडेकर होते, आंबेडकर जेव्हा शाळेत शिकायला होते

तेव्हा त्यांचे शिक्षक महादेव आंबेडकर यांनी त्यांना अंबावडेकर हे शब्द बोलायला नीट येत नसेल म्हणून म्हणून बाबासाहेबांचे नाव आंबेडकर असे ठेवले आणि याच नावाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जगाला परिचित आहेत

हे पण जाणून द्या : डॉ.ए. पी. जे. अब्दुल कलाम मराठी निबंध

बाबासाहेबांचे शिक्षण विषयक विचार

शिक्षण वाघिणीचे दूध आहे आणि तो 

जो प्राशन करेल तो गरजल्याशिवाय राहणार नाही" 

हे वाक्य बाबासाहेबांनी अगदी खरोखर लिहिला आहे आंबेडकरांनी अस्पृश्यांचे आणि दलितांचे निवारण केले त्यांनी अमेरिकेच्या कोलंबिया युनिव्हर्सिटी या जगातील प्रमुख शिक्षा संस्थांमध्ये उच्च दर्जाचे शिक्षण घेतले होते

आंबेडकरांनी अर्थशास्त्रात पीएचडी केली होती त्यांनी या विद्यालयात जाती विनाशाचा प्रमुखपणे अभ्यास केला होता कारण त्यांना अस्पृश्य आणि दलित लोकांना त्यांचा हक्क मिळवून द्यायचा होता आणि हे महान कार्य त्यांनी पार पाडली त्यांनी अस्पृश्यांना मंदिरात आणि अनेक सामाजिक गोष्टींमध्ये हक्क मिळवून दिले.

दलित आणि अस्पृश्यांचे उत्थान आणि प्रगती करण्यासाठी त्यांनी आपल्या संपूर्ण जीवनाचे त्याग केले म्हणून आंबेडकर हे दलितांचे उद्धारकर्ते आहेत, समाजात आज दलितांच्या स्थानाचे त्यांच्या हक्कांचे संपूर्ण श्रेय डॉक्टर भीमराव आंबेडकर यांना जाते

एवढेच नव्हे तर त्यांचं नाव कोलंबिया विद्यापीठातील जगाच्या शिक्षा संस्थांमध्ये शंभर विद्वानांच्या यादीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे चौथ्या क्रमांकावर आहेत आणि आईन्स्टाईन हा सहाव्या क्रमांकावर आहे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जगप्रसिद्ध आईन्स्टाईन पेक्षाही बुद्धीने हुशार आणि कुशाग्र आहेत, हे म्हणायला काहीच हरकत नाही

आंबेडकर यांनी 64 विषयांमध्ये मास्टरी केली होती आणि त्यांना एकूण 9 भाषा अवगत होत्या. भारतातील डॉक्टर बी. आर .आंबेडकरांसारख्या महान सूर्याला येथील मनुवादी ढगांनी कितीही झाकण्याचा प्रयत्न केला तरी हा सूर्य जातीपवादी ढगांना बाजूला सारून आपल्या तेजाने संपूर्ण जगाला प्रकाशित करीत आहे म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब हे फक्त भारतरत्न नाही तर विश्वरत्न आहेत

आंबेडकरांजवळ ज्ञानाचा अथांग भांडार होता अष्टपैलुंनी परिपूर्ण होते त्यांना प्रत्येक क्षेत्राचे ज्ञान होते सामाजिक ,आर्थिक, शैक्षणिक, कायदे, धार्मिक ,पत्रकारिता ,साहित्य, अशा क्षेत्रांचे ज्ञान त्यांना होते एवढेच नव्हे तर स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री म्हणून ही ते ओळखले जातात बाबासाहेब आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रज्ञ होते ते फक्त विचारवंत नव्हते तर ते प्रत्यक्ष अंमलबजावणी करणारे व्यावहारिक धोरण कर्ते आणि तज्ञ होत.

वाचन प्रेमी आंबेडकरांना ग्रंथपालाची गोड शिक्षा

आंबेडकरांचे वाचन अफाट पाठ होते त्यांना वाचनाची खूप आवड होती, बाबासाहेब एकदा ग्रंथालयात वाचन करत बसले होते ग्रंथालयाचा नियम होता की जोपर्यंत तुम्ही ग्रंथालयात आहात तोपर्यंत येथे काहीही खायचं प्यायचं नाही अन्यथा पुन्हा ग्रंथालयात प्रवेश नाही पण तरीही आंबेडकर वाचता-वाचता ग्रंथपालाची नजर चोरून पावाचे तुकडे खात असत

एकदा ग्रंथपालाने त्यांना पावाचे तुकडे खाताना पाहिले तेव्हा ग्रंथपालाने त्यांना बोलावले आणि विचारले की तुम्हाला सगळे नियम माहीत असताना ग्रंथालयात पावाचे तुकडे का खाता तर आंबेडकर म्हणाले की आई म्हणाली होती ग्रंथालयात बसायचे असेल तर घरी येऊन जेवायचे नाही म्हणून मी पावाचे तुकडे घेऊन येतो आणि वाचता वाचता भूक लागली की खातो ग्रंथपालाचे डोळे भरून आले ते विचारात पडले की वाचनासाठी कोण न जेवता राहील का?

मग ते आंबेडकरांना म्हणाले, तुम्ही नियम तोडले तर शिक्षा तर होणारच आंबेडकर म्हणाले तुम्ही मला जी शिक्षा द्याल ती मी भोगायला तयार आहे पण मला ग्रंथालयात न येण्याची शिक्षा देऊ नका त्यावर ग्रंथपाल म्हणाला मी तुम्हाला ग्रंथालयाच्या बाहेर नाही काढणार पण मी उद्यापासून तुमच्यासाठी डब्बा आणत जाईल ते तुम्ही माझ्यासोबत आनंदाने बसून खावा हीच तुमची शिक्षा !

आंबेडकरांना हे ऐकून अत्यानंद झाला त्यांनी ही शिक्षा मान्य केली अशाप्रकारे ही गोड शिक्षा ग्रंथपालाने आंबेडकरांची वाचनाची आवड पाहून दिली म्हणून आंबेडकर म्हणायचे की स्वर्ग मला आवडणार नाही आणि जिथे पुस्तक असेल ती जागा मला स्वर्गापेक्षा ही गोड वाटेल

आंबेडकरांचे स्त्री विषयक महान धोरण

शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा  हा मोलाचा संदेश आंबेडकरांनी स्त्रियांना सक्षम आणि हक्क मिळावेत म्हणून दिले आहे आणि मुख्यता आपल्या दलित आणि अस्पृश्य लोकांना जे शिक्षणापासून समाजाच्या जाती विभाजनामुळे वंचित राहिले अशांना आंबेडकर हा मोलाचा संदेश देतात

25 डिसेंबर 1927 रोजी मुक्कामी मनुस्मृती दहन केली व स्त्रीवर्गाला मनुस्मृतीच्या बंधनातून मुक्त केले एक महिला कधी मज्जित ची मौलाना नाही बनली एक महिला कधी मंदिराचे मुख्य पुजारी नाही बनली एक महिला कधी चर्च ची पादरी नाही बनली कधी कोणत्या धर्माची महिला विश्वविख्यात धर्मगुरू नाही बनू शकली पण एक महिला धरासभ्य, सांसद ,स्पीकर ,मंत्री ,मुख्यमंत्री, प्रधानमंत्री, राष्ट्रपती, राज्यपाल, कलेक्टर, सचिव, अभियांत्रिकी, सगळे काही बनू शकते.

जे अधिकार धर्म महिलांना देऊ शकला नाही तेच सगळे अधिकार संविधानांमधून डॉक्टर बी. आर. आंबेडकर यांनी महिलांना दिले असे पराकोटीचे कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांच्या जीवनात संविधाना द्वारे पार पाडले

मूक नायकडॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बहुआयामी होते आंबेडकर म्हणतात माणसाला आपल्या गरिबीची नाही तर आपल्या दुर्गुणांची लाज वाटली पाहिजे समाजात जाती विभाजन मानले जात असे आंबेडकर महार जातीचे असल्यामुळे त्यांना कमी लेखले जात असत नोकरी करत असताना त्यांना समाजाच्या जाती विभाजनामुळे खूप काही सोसावे लागले त्यांना खालचा दर्जा दिला जात असे म्हणून आंबेडकरांनी कोल्हापूरला जाऊन शाहू महाराजांच्या मदतीने मूकनायक हे पहिले वृत्तपत्र 1920 रोजी सुरु केले

या मूकनायक द्वारे अस्पृश्य आणि दलित लोकांना हक्क मिळवून देण्याचे कार्य केले आणि लोकांना त्यासाठी प्रोत्साहित केले. अंधार रात्री दिवा लावण्याचे काम म्हणजेच दलित व अस्पृश्य लोकांना हक्क मिळवण्यासाठी काळोखात रोशनी दाखवण्याचे कार्य वृत्तपत्रातून आंबेडकरांनी केले आणि म्हणून आंबेडकर पत्रकार म्हणून संबोधले जाऊ लागले

मूकनायक या वृत्तपत्रांमुळे लाखो लोकांना त्यांचे सामाजिक आर्थिक हक्क मिळण्यास मदत झाली म्हणून आंबेडकर हे सगळ्यांचे नायक महानायक झाले

आंबेडकरांनी स्वीकारला बौद्ध धर्म

हिंदू धर्माच्या अस्पृश्य जातीमध्ये जन्मलेले बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी 500000 बांधवांसोबत हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्म स्वीकारला त्यांनी जाती विभाजन करणारे हिंदू धर्माचा त्याग केला आणि त्याचा कठोर शब्दांमध्ये टीका करून आपल्या पुस्तकात वर्णन केले आहे

आंबेडकर 1950 रोजी बौद्ध संमेलनात श्रीलंकेला गेले होते तेथे ते बौद्ध धर्माशी इतके प्रभावित झाले की त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारून हिंदू धर्माचा त्याग करण्याचा विचार केला त्यांचं म्हणणं होतं की हिंदू म्हणून जन्माला आलो म्हणून काय झालं पण मी हिंदू म्हणूनच नाही मरणार त्यांनी बौद्ध धर्म यासाठी स्वीकारला कारण त्यामध्ये जाती विभाजन केले जात नव्हते.

आंबेडकरांनी बौद्ध महासभेची स्थापना 1955 ला भारतात केले त्यांनी द बुद्ध आणि त्यांचे धर्म हा पुस्तक लिहिला पण त्यांच्या मृत्यूनंतर हे पुस्तक प्रकाशित झाले

संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर

राज्यघटनेचे शिल्पकार म्हणजेच स्वतंत्र भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना ओळखले जाते भारतीय संविधान लिहून लोकशाहीचा पाया त्यांनी मजबूत केला स्वातंत्र्य समता व बंधुता या तीन तत्वावर आधारित जीवन म्हणजेच लोकशाही स्वातंत्र्य सहानुभूती समता या तीन गोष्टींमुळे व्यक्तीचा सामाजिक बौद्धिक राजकीय आणि आर्थिक विकास होतो

भारताची राज्यघटना 26 जानेवारी 1949 ला लागू करण्यात आले पण 26 जानेवारी 1950 रोजी पासून साजरा करण्यात आली म्हणून हा दिवस भारताचा प्रजासत्ताक दिन म्हणून ओळखला जातो भारताची लोकशाही ही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे आणि त्याचे संविधानही जगात सर्वात मोठी आहे

आंबेडकरांनी हे संविधान दोन वर्ष अकरा महीने या कालावधीत पूर्ण केला म्हणजेच जवळ जवळ त्यांना तीन वर्षे संविधान लिहिण्यास लागली आंबेडकरांच्या अफाट बुद्धिमत्ता मुळे आणि त्यांनी नेमलेल्या समितीमुळे हे संविधान पूर्ण झाले भारताचे संविधानात एकूण 448 कलमे आहेत भारतीय संविधानाच्या उद्देशिकेप्रमाणे भारत हे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य या गोष्टींनी परिपूर्ण आहे

आंबेडकर यांनी 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान पूर्णपणे देशाला अर्पण केली म्हणून 26 नोव्हेंबर हा संविधान दिन म्हणून ओळखला जातो भारतीय संविधानात डॉक्टर आंबेडकर यांच्या विचारांची कल्पकता अनुभवी कायदेतज्ञ व्यापकता अर्थशास्त्रज्ञ व भविष्याचा वेध घेणारी चौकस दृष्टी स्पष्टपणे दिसून येते

आंबेडकरांचे मृत्यू

6 डिसेंबर 1956 रोजी या महामानवाने अखेरचा श्वास घेऊन जगाला निरोप दिला या दिवशी जनतेचा प्रचंड सागर उथळला होता

आंबेडकरांचा जन्मदिन हा भीम जयंती किंवा आंबेडकर जयंती म्हणून त्यांच्या स्मरणार्थ मोठ्या धूम धामात साजरा केला जातो अशा या महामानवाला माझा त्रिवार वंदन

जय भीम 

निष्कर्ष-

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असे कार्य केले जे पुढील दहा शतके कोणी करू शकणार नाही म्हणून आंबेडकर हे नायकांची नायक आहेत हे मान्य करण्यात काही हरकत नाही तुम्हाला जर पोस्ट आवडली तर नक्कीच कमेंट शेअर करा वाचल्या बद्दल खूप खूप धन्यवाद!!

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कब्बड्डी या खेळाची माहिती | Kabaddi Information in Marathi

 आजच्या संगणक आणि मोबाईलच्या युगात मुलांचे मैदानी खेळ खेळण्याचे प्रमाण कमी झाले आहे त्यामुळे मुलांच्या आरोग्यावर याचा खूप परिणाम होत आहे 'सुदृढ आरोग्य हीच आपली खरी संपत्ती आहे 'आणि याचे महत्त्व दिवसेंदिवस अधिक ठळकपणे समोर येत आहे आपण लहानपणापासून "आरोग्य धनसंपदा"  हा श्लोक म्हणत आहोत आणि आपलं आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी व्यायाम मध्ये सातत्य ठेवावे लागते आणि ते ठेवणे आज-काल अवघड झाले आहे म्हणूनच यावर उत्तम उपाय म्हणजे खेळ .या जगात खेळ न आवडणारा माणूस विरळाअसेल.खेळ हे दोन प्रकारचे असतात, बैठे आणि मैदानी पण खेळ कोणताही असो त्याने मन आणि शरीर तंदुरुस्त राहते आपले कौशल्य विकसित होते त्यामुळे आज आपण कबड्डी या लोकप्रिय व राज्यस्तरीय स्तरावर खेळल्या जाणाऱ्या खेळाबद्दल माहिती जाणून घेऊया कबड्डीचा(हुतुतू) उगम- हुतुतू या   महाराष्ट्रीयन  शब्दापासून कबड्डी हा शब्द तयार झाला आहे कबड्डी हा सांघिक मैदानी खेळ आहे अनेक तज्ञ व जाणकारांचा मते महाभारतातील अभिमन्यू या थोर योध्याने या खेळाची सुरुवात केली होती असे मानले जाते तर या खेळाची सुमारे चार हजार वर्षांपासून ख्याती आहे प्रत्येक राज्याच्

संत तुकाराम महाराजांचे चरित्र | Sant Tukaram Information in Marathi

 तुकाराम महाराज हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील एक संत होते आज आपण संत तुकाराम यांच्या बद्दल माहिती जाणून घेणार आहोत चला तर जाणून घेऊयात संत तुकाराम यांची जीवनप्रवास जाणून घेउयात  तुकाराम महाराजांचा जन्म        महाराष्ट्रातील देहू या पावन क्षेत्री एका मोरे घराण्यात इसवी सन १६०८ रोजी वसंत माघ शुद्ध पंचमीला संत तुकाराम महाराजांचा जन्म झाला. तुकाराम महाराजांचे संपूर्ण नाव तुकाराम बोल्होबा आंबिले असे होते. वडिलांचे नाव बोल्होबा आंबिले व आईचे नाव कनकाई आंबिले असे होते. तुकारामांच्या वडीलांची शेतीभाती होती त्यांचे किराणा मालाचे दुकान सुद्धा होते. बोल्होबा म्हणजेच तुकारामांचे वडील अडल्या-नडल्यांना कर्ज देत असत.  बोल्होबा आंबिले यांना तीन अपत्ये होती पहिला सावजी मधले तुकाराम व कान्होबा पण तुकारामांचा मोठा भाऊ स्वभावाने विरक्त होता व कान्होबा सर्वात लहान असल्याने घराची संपूर्ण जबाबदारी तुकोबांवर होती. तुकोबांचे लग्न चौदाव्या-पंधराव्या वर्षी पुण्याचे आप्पाजी गुळवे यांची कन्या आवली (आवडी ) हिच्याशी प्रथम विवाह झाला, त्यानंतर त्यांच्यावर अचानक दुःखाचे डोंगर कोसळू लागले त्यांना अनेक प्राप

महात्मा गांधी- जीवन परिचय मराठी मध्ये ~ Mahatma Gandhi Information In Marathi

 आज आपण स्वातंत्र्य स्वतंत्र भारतात मुक्तपणे श्वास घेत आहोत, कारण की ते हुतात्म्यांनी व स्वातंत्र्यलढा यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी संपूर्ण जीवन समर्पित केले. त्या स्वातंत्र्यलढा पैकी एक आहेत आपले राष्ट्रपिता महात्मा गांधी, भारतमातेचे थोर सुपुत्र जगाला अहिंसेचे महान संदेश देणारे गांधीजी हे वंदनीय युगपुरुष होते. ते आपल्या कर्तृत्वामुळे महात्मा व राष्ट्रपिता अशा पदापर्यंत पोहोचले महात्मा गांधींचा जन्म          महात्मा गांधी या थोर राष्ट्रपिता जन्म 2 ऑक्टोबर १८६९ साली काठीयावाड पोरबंदर गुजरात येथे पुतळीबाई यांच्या पोटी झाला. गांधीजींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते, त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद गांधी व आईचे नाव पुतळीबाई गांधी असे होते, गांधीजी हे करमचंद यांच्या चौथ्या पत्नीचे म्हणजेच पुतळीबाईचे सुपुत्र आहेत आधीच्या तीन पत्नी या गर्भवती असतानाच मरण पावल्या .गांधीजींच्या आजोबाचे नाव उत्तम चंद उर्फ उत्ता गांधी असे होते, करमचंद गांधी हे गुजरातमधील पोरबंदर मध्ये दिवाण होते. धार्मिक वातावरणातील बालपणाचा मोठा प्रभाव गांधीजींच्या मनावर झालेला होता. विशेषता अहिंसा सहिष्णुता शाकाह