Sachin tendulkar जीवनचरित्र | सचिन तेंडुलकर information in marathi

जगातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूंमध्ये सचिन तेंडुलकर हा एक क्रिकेटपटू आहे आतापर्यंत सर्वाधिक धावा करणाऱ्या प्रतिभावान खेळाडू म्हणून सचिन ओळखला जातो सचिनच्या नावावर अनेक  उत्कृष्ट रेकॉर्डस् आहेत तो भारतीयांचीच नव्हे तर जगातील क्रिकेटप्रेमींचा आवडता व आदर्श बनला आहे सचिन तेंडुलकर हा क्रिकेटचा देव मानला जातो

सचिन तेंडुलकरचा जन्म

सचिन तेंडुलकरचा जन्म 24 एप्रिल 1973 साली झाला तो मुंबईतील एका महाराष्ट्रीयन ब्राह्मण कुटुंबातील होता सचिनच्या वडिलांचे नाव रमेश तेंडुलकर तर आईचे नाव रजनी तेंडुलकर असे होते त्याचे वडील एक प्रख्यात मराठी लेखक व कादंबरीकार होते तर आई विमा कंपनीत विमा एजंट म्हणून काम करीत असत सचिनला पहिल्या आईचे तीन सावत्र भावंडे आहेत त्याचे बालपण वांद्रे च्या साहित्य सहवास सहकारी संस्थेत गेले सचिन लहानपणी खूप खोडकर होता त्याने आपल्या खोडकर पणामुळे शेजाऱ्यांना सुद्धा त्रासून सोडले होते लहान असताना त्याला टेनिस खेळाची खूप आवड होती अमेरिकेचा प्रमुख टेनिसपटू जॉन मेकॅनारॉला तो आपला आदर्श मानत होता सचिन तेंडुलकर चा मोठा भाऊ अजित याने त्याचे क्रिकेट कौशल्य ओळखले व या क्षेत्रात पुढे जाण्यास त्याला प्रोत्साहन दिले एवढेच नव्हे तर अजितने सचिनची ओळख मुंबई मायानगरी तील शिवाजी पार्क येथील क्रिकेटचे उत्तम प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्याशी करून दिली

सचिनचे शिक्षण

सचिन तेंडूलकर हे अभ्यासात मध्यम श्रेणीचा होते ते काही अभ्यासात फारसे चांगले नव्हते त्यांनी त्यांचे प्रारंभिक शिक्षण वांद्र्यातील इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल मध्ये पूर्ण केले पुढे दिग्गज क्रिकेटपटू प्रख्यात प्रशिक्षक असलेले रमाकांत आचरेकर यांनी सचिनला त्याच्या क्रिकेटच्या प्रतिभेमुळे दादरमधील शारदाश्रम विद्यामंदिर हायस्कूलची शिक्षण पूर्ण करण्याचा सल्ला दिला पण खरं तर त्या शाळेचा क्रिकेटचा संघ खूपच चांगला होता आणि या शाळेने बरेच नामांकित आणि उत्कृष्ट खेळाडू बनवले आहेत

 यानंतर सचिन तेंडुलकरने आपली उच्च शिक्षण पूर्ण करण्यासाठी मुंबईतील खालसा महाविद्यालयात प्रवेश घेतला परंतु तो त्याने तिथेच थांबला व आपले सगळे लक्ष क्रिकेटवर केंद्रित केले त्यांनी फक्त क्रिकेटच्या क्षेत्रात कारकीर्द नाही घडवली तर त्यांनी आपल्या क्रिकेटच्या क्षमतांनी जगाला आश्चर्यचकित केले त्याच्या विलक्षण आणि आश्चर्यचकित करणाऱ्या क्रिकेटच्या कौशल्यामुळे आज सचिन क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जातो

क्रिकेटच्या जगातील सचिन

अवघ्या अकरा वर्षाचा असल्यापासून सचिन ने क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती सचिन आपल्या गुरु रमाकांत आचरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी पार्कमधील मैदानावर क्रिकेटचा सराव करीत असत रमाकांत आचरेकर यांनी सचिन तेंडुलकर ला खूप मार्गदर्शन केले सचिन ने आपल्या मित्रांसोबत व सहखेळाडू विनोद कांबळे यांच्यासोबत हारिस शिल्ड च्या सामन्यात 664 धावांची अजस्त्र भागीदारी रचली होती सचिन पंधरा वर्षाचे असताना त्याने मुंबई संघामधून गुजरात संघाविरुद्ध सामना खेळला होता आणि पहिल्याच सामन्यात शतक करणारा तो त्यावेळी सर्वात तरुण खेळाडू होता सचिन वयाच्या १५ व्या वर्षीच भारतीय संघात सामील झाला

Read Also : Cricket Information In marathi

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिन

1990 साली कसोटी कारकिर्दीत इंग्लंडच्या दो. च्या सामन्यात सचिनने पहिले शतक (नाबाद 119) झळकावले त्यानंतर शतकांची शृंखला ही  ऑस्ट्रेलिया दक्षिण आफ्रिकेतील दौऱ्याच्या दरम्यान सुरू राहिली आपल्या कसोटी कारकिर्दीत सचिन तेंडुलकर चे तब्बल 21 सामने विदेशात केले आहेत सचिन 1992 ते 93 च्या दरम्यान इंग्लंड विरुद्ध खेळला गेलेला सामना भारतातील सचिनचा पहिला सामना होता शारजा येथील कोका कोला वन डे विश्वचषक सामन्यांच्या उपांत्य फेरीत सचिनने सदैव स्मरणात राहील अशी कामगिरी केली ही कामगिरी डेझर्ट स्टॉर्म म्हणजेच वाळवंटातील वादळ म्हणून प्रसिद्ध आहे या कामगिरीमुळे संपूर्ण जग चमत्काराच्या दृष्टीने सचिन कडे पाहू लागले आणि लगेच दोन दिवसानंतर ऑस्ट्रेलिया विरुद्ध सामना सचिनने पुन्हा एकदा 131 चेंडूत 134 धावा काढून भारताला विजय ठरवले हे पाहून क्रिकेट इंटरनॅशनल (cricket international) या पत्रिकेने सचिन ला दुसरा बॅडमॅन म्हणून संबोधले आणि खुद्द बॅडमॅनने ही या गोष्टीला दुजोरा दिला

 क्रिकेट इतिहासात सचिनचे जागतिक सचिनचे जागतिक पातळीवर सर्वाधिक 39 शतक चार दुहेरी शतक आणि नाबाद 248 सर्वोच्च धावसंख्या यांचा समावेश आहे एकदिवसीय सामन्यांमध्ये सचिनने सर्वाधिक म्हणजेच 42 शतक झळकवले आहे एकूण 89 अर्धशतकांची रेकॉर्ड त्याच्या नावावर आहे सचिनच्या विलक्षण व प्रभावी खेळामुळे कर्णधार पदाची सूत्रे त्यांच्या हाती दिली गेली पण त्यात त्याला यश मिळाले नाही परंतु आपल्या खेळातील आकर्षण खेळामुळे आणि आपल्या व्यक्तिमत्त्वामुळे जगभरातून त्याने प्रेम व आदर कमावले लहान असो वा मोठा तरुण असो वा वृद्ध आपल्या सगळ्यांसाठी क्रिकेटचे दुसरे नाव म्हणजे सचिन तेंडुलकर होय तो आज आपल्या खेळामुळे जगासमोर एक उत्कृष्ट आदर्श बनला आहे

सचिनने केलेले उत्कृष्ट 1० विक्रम

1) सचिन मिरपूर येथील बांगलादेश विरुद्ध शंभर शतके पूर्ण केली

2) वन डे आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्याचा इतिहासात दुहेरी शतक करणारा पहिला क्रिकेटपटू ठरला

3) वन डे आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात सर्वात जास्त म्हणजेच 18 हजार पेक्षा अधिक धावा काढणारा खेळाडू ठरला

4) वन डे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 49 शतक बनविणारा क्रिकेटर बनला

5) सचिन ने एक वन डे आंतरराष्ट्रीय विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक धावा काढल्याचा रेकॉर्ड आहे.

6) कसोटी क्रिकेटमध्ये सचिन ने सर्वात जास्त धावा काढल्या

7) सचिनने सर्वाधिक वेळा मालिका एक दिवसीय आंतरराष्ट्रीय स्पर्धेत केला होता म्हणून तो मालिकावीर  म्हणून ही ओळखला जातो

8) कसोटी क्रिकेटच्या सामन्यात 13000 धावा काढणारा जगातील पहिला फलंदाज म्हणून सचिन ओळखला जातो

9)  वन-डे आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सर्वाधिक वेळा सचिन मॅन ऑफ द मॅच बनला आहे

10) आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सचिन ने तब्बल तीस हजार धावा करण्याचा मान पटकावला आहे


सचिन ला मिळालेले अवार्ड

1) 2013 मध्ये देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न हा भारत सरकारने प्रदान केला

2) 1997 मध्ये राजीव गांधी खेलरत्न  हा कोणत्याच खेळाडू ला न मिळालेलं पुरस्कार देण्यात आला

3) 1999 मध्ये पद्मश्री पुरस्कार देण्यात आला

4) 2008 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आला

5) 1994 मधील अर्जुन पुरस्कार

6) 2001 मधील महाराष्ट्र भूषण पुरस्कार

7) 2010 मध्ये एलजी पीपल्स चॉईस

8) 2011 मधील बीसीसीआय क्रिकेटर ऑफ द इयर हा पुरस्कार मिळाला.


Read Also : Cricket Information In marathi

सचिन तेंडुलकर चे वैयक्तिक जीवन

सचिन तेंडुलकर चा विवाह आनंद मेहता या गुजराती उद्योगपतीच्या अंजली नावाच्या मुलीशी 1995 साली झाला, अंजली तेंडुलकर या आहेत त्यांना सारा आणि अर्जुन तेंडुलकर अशी दोन अपत्ये आहेत

सचिन तेंडुलकर हा आपला भारताचा उत्कृष्ट व सर्वांचे आदर्श असलेला खेळाडू आहे म्हणून भारतातील क्रिकेट चाहत्यांसाठी आणि आपल्या जनरल नॉलेज साठी आम्ही हा आर्टिकल लिहला आहे . तुम्हाला सचिन तेंडुलकर विषयी हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कंमेंट मध्ये जरूर कळवा आणि जर आमच्या कडून कोणतीही माहिती चुकून राहली असेल किंवा तुम्हाला असे वाटत असेल कि ती माहिती ह्या आर्टिकल समाविष्ट व्हायला पाहिजे तर नक्की आम्हला कंमेंट मध्ये सांगा धन्यवाद