संत ज्ञानेश्वर महाराज माहिती Sant Dnyaneshwar Information in Marathi

 संत ज्ञानेश्वर हे तेराव्या शतकातील अलौकिक प्रतिभा व अद्वितीय व्यक्तिमत्त्व असणारे सर्व श्रेष्ठ संत होते.संत ज्ञानेश्वरांचा जन्म इ.स .१२७५ मध्ये माता रुक्मिणीबाईच्या पोटी आपेगाव ( औरंगाबाद जिल्हा ) येथे झाला .ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत हे संन्यास घेऊन पुन्हा गृहस्थाश्रमात परतले होते गृहस्थाश्रमात प्रवेश केल्यानंतर त्यांना निवृत्ती , ज्ञानदेव , सोपान व मुक्ताबाई ही चार मुले जन्मली . आदिनाथ मत्स्येन्द्रनाथ गोरक्षनाथ गहिनीनाथ निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर त्यांनी स्वतःची नाथ संप्रदायाची गुरु परंपरा सांगितलेले होते त्यावेळच्या समाजाने विठ्ठल पंत तसेच त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचा अतोनात छळ केला.संन्याशाची मुले म्हणून त्यांना समाजाने वाळीत टाकले . 

आई वडिलांचा मृत्यू झाल्यानंतरही ज्ञानेश्वर व त्यांच्या भावंडांना लोकांनी खूप त्रास दिला. अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या मूलभूत गोष्टीसुद्धा नाकारले पैठणला जाऊन संत ज्ञानेश्वरांनी विद्वत्ता सिद्ध केले आपल्या काव्य रचनेत ज्ञानेश्वरांनी बाप विठ्ठल सूत ज्ञानाबाई बाप रखुमाई वर ज्ञाना आणि ज्ञानदेव अशी नावे वापरल्याचे आढळते संत ज्ञानेश्वरांनी लहान वयापासून लोकनिंदे - कडे लक्ष न देता आध्यात्मिक प्रगती केली . 

संत ज्ञानेश्वरांचे साहित्य

संत ज्ञानेश्वर हे ज्ञानाचे मूर्तीमंत प्रतिक होते . संत ज्ञानेश्वर विठ्ठलाचे परमभक्त होते . ज्ञानेश्वरांनी वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी मराठी तील सर्वश्रेष्ठ , अद्वितीय ग्रंथ ज्ञानेश्वरीची रचना केली . ज्ञानेश्वरीला भावार्थ दीपिका असेही म्हणतात .ज्ञानेश्वरांनी संस्कृत भाषेतील ज्ञान ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून प्राकृत भाषेत आणले . ज्ञानेश्वरी सर्व स्तरातील लोकांना भुरळ घालते.ज्ञानेश्वरी तील सुमारे ९ ००० ओव्यामधील भक्तीचा ओलावा , विचारांची संपन्नता अतुलनीय आहे . ज्ञानसूर्य संत ज्ञानेश्वरांचा तत्वज्ञानातील सर्व श्रेष्ठ ग्रंथ अनुभवामृत किंवा अमृतानुभव हा स्वरचित ग्रंथ आहे .त्यामधील ८०० ओव्या त्यांच्या प्रतिभेची खोली व्यक्त करतात . संत ज्ञानेश्वरांनी आशयसंपन्न व प्रत्यक्ष अनुभूती संपन्न अभंग हरिपाठाची रचना करून मराठीचा अभिमान वाढवला.ज्ञानेश्वराचा हरिपाठ हा उत्कृष्ट ईश्वरी नामस्मरणाचा नामपाठ आहे.ज्ञानेश्वरीच्या शेवटच्या अध्यायात ज्ञानदेवांनी विश्वकल्याणासाठी प्रार्थना अर्थात पसायदान लिहले .संत ज्ञानेश्वरांच्या कोणत्याही रचनेत त्यांच्या कुटुंबावर समाजाने केलेले अत्याचार जाण वत नाहीत.

Also Read : संत एकनाथ महाराज माहिती 

ज्ञानेश्वरी 

मराठी संस्कृती व भाषेवर संत ज्ञानेश्वरांचा व त्यांच्या भावंडांचा असलेल्या प्रखर प्रभाव आजही अबाधित आहे संत ज्ञानेश्वरांची शब्दरचना ही अत्यंत रसाळ भाषेत केलेली आहे संत ज्ञानेश्वर निवृत्तीनाथांना आपले गुरु मानत असत आपल्या गुरूंच्या आशीर्वादाने गीतेवर नेवासा क्षेत्रात त्यांनी प्रख्यात टीका केली हेच ग्रंथ ज्ञानेश्वरी किंवा भावार्थदीपिका म्हणून ओळखले जाते संस्कृत भाषेतील ज्ञान त्यांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून आपल्या प्राकृत भाषेत आणले ज्ञानेश्वरी ही कर्मयोग ज्ञानयोग व भक्तियोग सांगणारी सुमारे नऊ हजार ओव्यांनी भरलेले आहे अमृतानुभव हा ज्ञानेश्वरांना लिहिलेला दुसरा ग्रंथ होय हा ग्रंथ विशुद्ध तत्त्वज्ञानाचा व जीव ब्रह्म ऐक्याचा ग्रंथ आहे या ग्रंथातील सुमारे 800 ओव्या 10 प्रकरणांमध्ये विभागलेल्या आहेत तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने हा ग्रंथ सर्वश्रेष्ठ आहे

साप सीडी आणि संत ज्ञानेश्वर

अबाल बुद्धांचा आवडता आणि सहज घराघरात खेळला जाणारा खेळ म्हणजे सापशिडी होय सापसिडी खेळाची निर्मिती सर्वात पहिल्यांदा संत ज्ञानेश्वर माऊली नी केली काही वर्षांपूर्वी डेन्मार्क जॅकॉब यांच्या मदतीने हे रहस्य उलगडले गेले वा ल मंजुळ हे संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक व संशोधक आहेत त्यांच्याजवळ जॅकॉब यांनी विचारणा केली व तश्या प्रकारचा संदर्भ मंजुळ यांनी डेक्कन कॉलेजमध्ये असल्याचे सांगितले आणि त्यांनी मोक्षपद उलगडा केला संत ज्ञानेश्वर हे माऊली म्हणूनही ओळखले जातात माऊली आणि निवृत्तीनाथ हे दोघेही जेव्हा भिक्षा मागायला जात तेव्हा मुक्ताई व सोपान देव यांचे मन रमावे म्हणून संत ज्ञानेश्वर व निवृत्तीनाथ यांनी या खेळाचा शोध लावला असे सांगितले जाते

संत ज्ञानेश्वरांच्या रचना चांगदेव हे एक म्हणून ओळखले जायचे ते तब्बल चौदाशे वर्ष जगले असे संदर्भ इतिहासात मिळतात संत ज्ञानेश्वरांनी चांगदेव पासष्टी या ग्रंथाद्वारे चांगदेवाचा गर्वाचे हरण करून त्यांना उपदेश केला होता मात्र तरीही त्यांचा अहंकार गेला नव्हता संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेले 65 ओव्यांचे उपदेश पत्र म्हणजे चांगदेव पासष्टी होय चांगदेव पासष्टी मध्ये अद्वैत सिद्धांतांचे अप्रतिम दर्शन होते हरिपाठ हा संत ज्ञानेश्वरांचा नाम पाठ आहे हरिपाठात एकूण 28 अभंग आढळतात हरिपाठ यामध्ये हरिनामाचे महत्त्व विशद केले आहे याशिवाय त्यांनी अभंग स्फुटकाव्य व विराण्या ही लिहिली आहेत

जो जे वांछील तो ते लाहो अमृतानुभव या ग्रंथाची रचना केल्यानंतर संत ज्ञानेश्वरांनी तीर्थयात्रा केली तीर्थावली या संत नामदेव महाराजांच्या संत ज्ञानेश्वरांच्या तीर्थयात्रेचा उल्लेख आढळतो यानंतर ज्ञानेश्वर माऊलींनी समाधी घेण्याचा निर्णय घेतला जो जे वांछील तो ते लाहो असे म्हणत ज्ञानेश्वर महाराज काळजी करत असतात धर्मातील क्लिष्ट अवडंबरे काढून त्यांनी धर्माला कर्तव्याचा वेगळा अर्थ दिला अशा या महान विभूतीने वयाच्या २१ व्या वर्षी आळंदी इथे इंद्रायणी नदीतीरी संजीवन समाधी घेतली . तेराव्या शतकातील ज्ञानेश्वरांचे कार्य पाहून आज प्रत्येकाचे मन अचंबित होते .

संत ज्ञानेश्वरांचे अभंग

     1) विश्वाचें आते माझ्या मनी प्रकाशले । 

        अवघेचि जालें देहब्रह्म ॥१ ॥

    आवडीचे वालभ माझेनी कोंदाटलें । 

    नवल देखिलें नभाकार गे माये ।।२ ।।                  

  बापरखुपादेविवरु सहज निटु जाला ।

     हृदयीं नटावला ब्रह्माकारें ॥३ ॥ 

सारांश- 

सर्व विश्व रात्रंदिवस ज्या ब्रापासीची इच्छा करीत आहे , ते परबहा माझ्या मनात प्रकाशल्यामुळे माझा सर्व देद ब्रह्मरूप झाला . ते माझे आवडीचें प्रेम माझ्या रूपानें कोंदून गेले . ते आकाशस्वरूपी परमात्म चैतन्य मी पाहिले याचे मोठे नवल वाटते ! रखुमादेवीवर जो बाप श्रीविठ्ठल , जो लोकांना भेटण्याला फार कठीण , तो मला सहज प्राप्त झाला , आणि हृदयांत उत्तम प्रकारें ब्रझाकार होऊन राहिला , असें महाराज म्हणतात . ( परमार्थस्वरूपाचा यथार्थ अनुभव झाला असतां दुःखरूप प्रपंच कसा बाधीत होतो व परमानंद कसा होतो व काय स्थिति होते . याचे सुंदर वर्मन या अभंगांत आहे )

2) मन हे राम जालें मन हे राम जालें ।

 प्रवृत्ति ग्रासुनी कैसे निवृत्तीसी आले ॥१ ॥ 

 श्रवण कीर्तन पादसेवन कैसे विष्णुस्मरण केलें । अर्चन वंदन दास्य सख्य आत्मनिवेदन केलें ॥२ ॥

 यमनियम प्राणायाम प्रत्याहार संपादिले । 

ध्यान धारणा आसन मुद्रा कैसे समाधीस आले ||३|| 

बोधी बोधले बोधिता नये ऐसे जाले । बापरखुमादेविवरू विठ्ठले माझें मीपण हारपलें ४॥ 

ज्ञानदेवांची ही एक अगदी वेगळी रचना आहे .

सारांश- 

आपले मन रामरंगी रंगले आहे , असे सुरुवातीसच सांगून ज्ञानदेव म्हणतात की वृत्ति - प्रवृत्ती नष्ट होऊन आपल्याला निवृत्ती प्राप्त झाली आहे . या अभंगात ' नवविधा भक्ती ' आणि ' समाधिस्थिती ' यांचा अनोखा मेळ ज्ञानदेव घालतात . भक्तिमार्ग आणि योगमार्ग हे दोन्ही ईशप्राप्तीचेच मार्ग ; पण त्यांच्या रीती भिन्न . ज्ञानदेव श्रेष्ठ योगी होते , तितकेच श्रेष्ठ भक्तही होते . या दोन्ही मार्गाचे गुह्य ते जाणतात . कीर्तन , पादसेवन , स्मरण , अर्चन , वंदन , दास्य , सख्य आणि आत्मनिवेदन है नवविधा भक्तीचे प्रकार आणि यम , नियम , प्राणायाम , प्रत्याहार , ध्यान , धारणा , आसन आणि समाधी ही योगमार्गाची अष्ट अंगे . या साऱ्यांचे मर्म ज्ञानेश्वरांनी ओळखले . त्यातून आत्मबोधही झाला ; पण त्याला ' आत्म ' बोध म्हणावे तरी कसे ? कारण विठ्ठलाच्या कृपेने बोध झाला , तेव्हाच ' माझे मीपणही हरपले ' असे ज्ञानदेवांनी येथे म्हटले आहे .

Also Read : संत एकनाथ महाराज माहिती 

निष्कर्ष 

संत ज्ञानेश्वर हे आपल्या महाराष्ट्राचे  महान संत व कवी  आहे म्हणून जर आपल्याला हे आर्टिकल आवडले असेल तर नक्की आपल्या भाऊ बहिणी आणि मित्र परिवार सोबत शेयर करा आणि आपल्यास संत ज्ञानेश्वर बद्दल काही शंका असेल किंवा आपले मत असेल तर कंमेंट च्या माद्यमातून जरूर कळवावे