श्रेष्ठ संतकवी एकनाथ : Sant Eknath Maharaj information in Marathi

 एकनाथ महाराज महाराष्ट्राचे श्रेष्ठ संतकवी होते . ते सर्वसाधारणपणे जनसामान्यात एकनाथ म्हणून ओळखले जात होते पंधराव्या शतकात महाराष्ट्रात मुघलांच्या आक्रमणाने संस्कृती रसातळाला गेली होती . अध:पात वाढला होता . अशा काळी मोक्षमार्गाची कवाडे स्त्री ; शूद्रांना त्यांनी खुली करून दिली .

 संत एकनाथांचा जन्म-

 एकनाथांचा जन्म इसवी सन 1532 साली पैठण येथे झाला .वडील सूर्यनारायण व आई रुक्मिणी . एकनाथांना त्यांच्या आई-वडिलांचा सहवास फार काळ लाभला नाही ऐकनाथांच्या आई - वडीलांचे निधन लवकरच झाले त्यामुळे एकनाथ महाराजांचा सांभाळ आजोबा चक्रपाणी यांनी केला . वयाच्या बाराव्या वर्षी ते कोणालाही न सांगता सद्गुरूच्या शोधासाठी बाहेर पडले व देवगिरीच्या जनार्दन स्वामीन कडे राहिले . प्रपंच साधून परमार्थ कसा करावा हे तेथे ते शिकले . संत भानुदास हे संत एकनाथ महाराजांचे पणजोबा होते ते सूर्याची उपासना करीत असत.

संत एकनाथ महाराजांनी केलेले समाजकार्य

 एकनाथ महाराज अत्यंत नम्र स्वभावाचे होते . बालवयात चिंतन , मनन , अभ्यास , देवभक्ती याकडे त्यांचा ओढा होता . पैठण मधील संत एकनाथांचे मूळ पुरुष हे भास्करपंत कुलकर्णी हे होत.  संत एकनाथांचे गुरु हे जनार्दन स्वामी होते ते देवगिरी तील यवन दरबारात अधिपती असायची पण मूळचे चाळीसगावचे रहिवासी होते. जनार्दन स्वामींचे आडनाव देशपांडे होते, संत एकनाथांनी जनार्दन स्वामीना गुरु म्हणून मनोमन मानले होते ,संत एकनाथ यांनी परिश्रम करून आपल्या गुरूची सेवा केली त्यांनी गुरूं समवेत अनेक तीर्थयात्राही केल्या त्याने पुढे गुरूच्या आज्ञेनुसार गृहस्थाश्रम स्वीकारला होता गुरूंच्या आज्ञेवरून त्यांनी तीर्थयात्रा , काव्यरचना , व विवाह केला . त्यांनी बारा वर्षे तपश्चर्या केली . गुरु विषयी त्यांची इतकी विलक्षण भक्ती होती की प्रत्येक रचनेत ' एका जनार्दनी ' ही नाममुद्रा आढळते .

 त्यांनी अनेक तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्या .एकनाथ महाराजांचा सर्वाभूती परमेश्वर यावर अपार विश्वास होता . कोणताही भेदभाव , व अस्पृश्यता ते मानीत नसत . एकनाथी भागवत हा 18 हजार 798 ओव्यांचा महान ग्रंथ त्यांनी लिहिला . भावार्थरामायण , रुक्मिणी स्वयंवर , इत्यादी ग्रंथ त्यांनी लिहिले . तसेच भक्तिमार्गाचे मर्म ठसवणारी पदे , गवळणी , अभंग , भारुडे , गोंधळ , राकडे या ललिताद्वारे त्यांनी समाजात जागृती निर्माण केली . मला दादला नको ग बाई , पाव ग भवानी आई रोडगा वाहीन तुला , इत्यादी भारूडातून परमार्थाची शिकवण दिली . गावबा हे संत एकनाथ महाराजांचे निष्ठावान शिष्य होते एकनाथांनी लिहिलेला भावार्थ रामायण हा ग्रंथ त्यांनी पूर्ण केला

संत एकनाथ महाराजांचे वैयक्तिक जीवन- संत एकनाथांनी वैजापूर येथील पैठण जवळच्या एका गिरिजाबाई नावाच्या मुलीशी विवाह केला संत एकनाथांना तीन अपत्य होती दोन मुली व एक मुलगा ती म्हणजे गोदावरी गंगा व  हरी. त्यांचा हरी नावाचा मुलगा हा हरिपंडित झाला त्याने आपल्या वडिलांचे म्हणजे नाथांचे शिष्यत्व पत्करले पुढे संत एकनाथांनी समाधी घेतल्यावर हरी पंडितांनी दरवर्षी नाथांची पादुका आषाढी वारीसाठी पंढरपुरास नेले कवी मुक्तेश्वर हे नाथांचे मुलीकडून नातू होत

संत एकनाथांचे साहित्य -

संत ज्ञानेश्वर हे वारकरी संप्रदायाचा पाया म्हणून ओळखले जातात संत ज्ञानेश्वरांच्या समाधी नंतर सुमारे 250 वर्षांनंतर संत एकनाथ यांचा जन्म झाला होता संत एकनाथांना युगप्रवर्तक असे म्हटले जाते त्यांनी भारुडे अभंगाच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलन तसेच जातिभेदाच्या विरोधात अनेक समाज कार्य केले संत एकनाथांचा एकनाथी भागवत हा खूप लोकप्रिय ग्रंथ होता यामध्ये एकादश खंडावरील केलेली टीका आढळते एकनाथी भागवत ग्रंथामध्ये एकूण श्लोकाची संख्या 1367 आहेत परंतु त्यावर भाष्य म्हणून संत एकनाथांनी 8810 श्रीमद्भागवत पुराणाच्या कंदावर ओव्या लिहिलेल्या व्यास मुलींनी बसलेले भागवत आहे व संत एकनाथांनी लिहिलेल्या सुमारे 40 हजार ओव्या भावार्थ रामायणाचा आहेत रुक्मिणीस्वयंवर नावाचे काव्य हे संत एकनाथांनी लिहिले आहे त्यांनी दत्ताची आरती लिहिली आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्ञानेश्वरांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी ची मूळ प्रत शुद्ध केली त्याने देवांना मानत असतात त्यांनी जातिभेद दूर करण्यासाठी आयुष्यभर पराकोटीचे प्रयत्न केले

मराठी भाषेचे संपादक संत एकनाथांनी ज्ञानेश्वरांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी चे मुळत शुद्ध केले त्यामुळे मराठी भाषेचे पहिले संपादक होण्याचा मान त्यांना जातो अमृताहून गोड असलेल्या मराठी भाषेला त्यांनी अधिक समृद्ध केले लोक भाषा बनवली मराठी भाषेबरोबरच त्यांनी हिंदी भाषेला सुद्धा प्राधान्य दिला हिंदी भाषेत त्यांनी अनेक रचना केल्या त्यांनी केवळ समाजाला उपदेश नाही केला तर ते कृतिशील होत त्यांनी डोळस आणि कृतिशील समाज निर्माण करण्याचा प्रयत्न केला

संत एकनाथांनी समाजाला दिलेला संदेश-

नाथांची पत्नी गिरिजाबाई सुशील , सांध्वी होत्या नाथांच्या घरी स्पृश्य - अस्पृश्यांचा मेळावा भरे . भेदभाव न मानता माणुसकीने वागा असा उपदेश त्यांनी सर्वांना केला . गाढवाला गंगा पाजने , हरिजनाचे पोर हृदयाशी कवटाळणे , श्राद्धप्रसंगी अस्पृश्यांना जेऊ घालने यातून सामाजिक भाव प्रकट होतात . त्यांनी भक्तांची व संतांची चरित्रेही लिहिली.

एकनाथांची गुरुपरंपरा :

● नारायण (विष्णू)

● ब्रह्मदेव

● अत्री ऋषी

● दत्तात्रेय

● जनार्दनस्वामी

● एकनाथ


* एकनाथांचे कार्य व लेखन- संत एकनाथांनी आपल्या साहित्यात विपुल लेखन केले आहेत 

◆ अनुभवानंद

◆ रुक्मिणी स्वयंवर

◆ आनंदलहरी

◆ एकनाथी अभंग गाथा

◆ चिरंजीवपद

◆ चतु:श्लोकी भागवत

◆ मुद्राविलास

◆भावार्थ रामायण (४० हजार ओव्या) हिंदीसह अनेक भाषांत भाषांतरे)

संत एकनाथांचे  महत्वाचे अभंग-

१) माझे माहेर पंढरी ।

आहे भीवरेच्या तीरी ॥१॥

बाप आणि आई ।

माझी विठ्ठल रखुमाई ॥२॥

पुंडलीक राहे बंधू ।

त्याची ख्याती काय सांगू ॥३॥

माझी बहीण चंद्रभागा ।

करितसे पाप भंगा ॥४॥

एका जनार्दनी शरण ।

करी माहेरची आठवण ॥५॥२) ॐकार स्वरूपा, सद्गुरू समर्था ।

नाथाच्या नाथा, तुज नमो ।

तुज नमो, तुज नमो, तुज नमो ॥१॥

नमो मायबापा, गुरुकृपाघना ।

तोडी या बंधना मायामोहा ।

मोहोजाळ माझे कोण नीरशील ।

तुजविण दयाळा सद्गुरुराया ॥२॥

सद्गुरुराया माझा आनंदसागर ।

त्रैलोक्या आधार गुरुराव ।

गुरुराव स्वामी असे स्वयंप्रकाश ।

ज्यापुढे उदास चंद्र-रवी ।

रवी, शशी, अग्‍नि, नेणति ज्या रूपा ।

स्वप्रकाशरूपा नेणे वेद ॥३॥

एका जनार्दनी गुरू परब्रह्म ।

तयाचे पैनाम सदामुखी ॥४॥